पंतप्रधान कार्यालय

रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय

Posted On: 30 NOV 2018 11:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान मोदी, सोविएत संघ राज्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर व्ही पुतिन आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ब्यूनस आयर्समध्ये त्रिपक्षीय बैठक आयोजित केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर सहकार्य वाढविणे आणि तीन देशांमध्ये परस्पर संवादास अधिक प्रोत्साहन  देण्यासाठी या तीन नेत्यांनी आपल्या मतांची देवाण घेवाण केली. संयुक्त राष्ट्र संघ (यू एन.)आणि  जागतिक व्यापार संघटन अर्थात  डब्ल्यूटीओ तसेच  नव्याने  स्थापन झालेल्या  जागतिक वित्तीय संस्थांसह जगभरात लाभ घेतलेल्या बहुपक्षीय संस्थांची सुधारणा आणि मजबूतीचे महत्त्व त्यांनी मान्य केले. जागतिक विकास आणि समृद्धीसाठी त्यांनी बहुपक्षीय व्यापार प्रणाली आणि खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे फायदे अधोरेखित केले.

तीन नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरता यांना संयुक्तपणे प्रोत्साहित करण्यासाठी, दहशतवाद आणि हवामानातील बदलांसारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शांततापूर्ण रेजोल्यूशनला प्रोत्साहित करण्यासाठी ब्रिक्स, एससीओ आणि ईएएस यंत्रणे  द्वारे सहकार्य मजबूत करण्यासाठी सर्व स्तरांवर नियमितपणे सल्लामसलत करण्यास सुद्धा  सहमती दर्शवली.

या तीन नेत्यांनी आरआयसीच्या स्वरूपात सहकार्य करण्याचे  तसेच विविध प्रसंगी अशा त्रिपक्षीय बैठकी आयोजित करण्याचे मान्य केले.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1554487) Visitor Counter : 171


Read this release in: English