माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतात उत्तम चित्रपट निर्मितीसाठीचे कौशल्य- हादी मोहघेघ; पाच दिग्दर्शकांचा प्रसारमाध्यमांशी संवाद


रसिकांचे प्रेम आणि चित्रपटाला श्रद्धांजली देण्यासाठी ग्रामीण भागाचे कृष्ण धवल पद्धतीने चित्रण- सेर्जिओ ट्रीफॉट

Posted On: 27 NOV 2018 9:48PM by PIB Mumbai

पणजी, 27 नोव्हेंबर 2018

 

आंतरराष्ट्रीय सिनेमा वर्गवारीतील 49 व्या इफ्फी महोत्सवातील पाच चित्रपट दिग्दर्शकांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. इरो, द मॅनस्लेअर/द वर्जिन/द शॅडो, रेज’ ‘लॉस सिलेंसिओसआणि द लोडहे ते पाच चित्रपट आहेत.  

पोर्तुगीज आणि स्पॅनीश अशा दोन भाषात निर्मित लॉस सिलेंसिओसया चित्रपटाच्या दिग्दर्शिका बिट्रीझ सेग्नर यांनी यावेळी भारतीय चित्रपटांसोबतच्या आपल्या नात्याला उजाळा दिला. ब्राझीलमधील भारतीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांपैकी आपण एक असल्याचे त्यांनी सांगितले. बॉलिवूड ड्रीम हा त्यांचा पहिला चित्रपट भारत-ब्राझील देशांची पहिली एकत्रित चित्रपट निर्मिती होती. त्यांनी अनुराग कश्यप यांच्यासारख्या भारतीय दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे.

द लोडया चित्रपटात रहस्य, नाट्य तसेच युद्धाचे प्रसंग असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक ओग्जेन ग्लॅव्होनिक यांनी सांगितले. 1999 मधे सर्बियामधे झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या वेळी ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या व्लादा या व्यक्तीभोवती या चित्रपटाची कथा केंद्रित आहे. कोसावो ते बेलग्रेड या प्रवासादरम्यान त्याला आलेले अनुभव या चित्रपटात दर्शवण्यात आले आहेत असे ते म्हणाले.

द मॅनस्लेअर/द वर्जिन/द शॅडोहा सुलेव किड्स दिग्दर्शित इस्टोनिअन आणि स्पॅनीश द्वैभाषिक चित्रपट तरुण महिलांविषयक तीन कादंबऱ्यांवर आधारित आहे. सोविएत रशियाच्या कालखंडात इस्टोनियातील लोक भारतीय चित्रपट पाहत असतं असे किड्स यांनी यावेळी सांगितले. आजही चित्रपट महोत्सवातून दाखवल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपटांमुळे संबंध कायम असल्याचे त्यांनी सांगितले.  

रेजया पोर्तुगीज चित्रपटाचे दिग्दर्शक सेर्जिओ ट्रीफॉट यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. दक्षिण पोर्तुगालमधे हुकुमशाही अंतर्गत राहणाऱ्या लोकांची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात 1950 च्या दशकातील शोषण, गरीबी दर्शवण्यात आली असून शोषण करणाऱ्यांविरुद्ध लोकांमधे तयार होणारा संताप दर्शवण्यात आला आहे. हा चित्रपट अन्याय आणि सत्तेचा दुरुपयोग या संदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘IROया पर्शियन चित्रपटाचे दिग्दर्शक हादी मोहघेघ यांनी इराणमधे या चित्रपटाचे चित्रीकरण करतांना आलेले अनुभव सांगितले. चित्रपट निर्मिती उद्योगातील भारतीय कौशल्याचे त्यांनी कौतुकही केले.

पार्श्वभूमी:-

IRO

‘IRO या हादी मोहघेघ यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सोहराब या आपल्या मुलाचा प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि डोंगरात एकाकीपणे राहणाऱ्या एका वृद्धाची गोष्ट मांडण्यात आली आहे. मात्र या वृद्धाचे प्रयत्न अपुरे पडतात आणि आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन त्यांनी डोंगरनदीतून केलेला प्रवास या चित्रपटात दर्शवण्यात आला आहे.

द मॅनस्लेअर/द वर्जिन/द शॅडो

द मॅनस्लेअर/द वर्जिन/द शॅडोहा सुलेव किड्स दिग्दर्शित इस्टोनिअन आणि स्पॅनीश द्वैभाषिक चित्रपट तरुण महिलांविषयक तीन कादंबऱ्यांवर आधारित आहे.

रेज

रेजया चित्रपटात 1950 च्या दशकातील पोर्तुगालचे चित्रण करण्यात आले आहे. एका रात्रीत घडणाऱ्या घटनांचे यात चित्रीकरण आहे.

लॉस सिलेंसिओस

लॉस सिलेंसिओस ही दिग्दर्शिका बिट्रीझ सेग्नर यांनी पोर्तुगीज आणि स्पॅनीश अशा दोन्ही भाषांत दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

द लोड

द लोड हा ओग्जेन ग्लॅव्होनिक यांनी दिग्दर्शित केलला सर्बियन भाषेतील चित्रपट आहे.   1999 मधे सर्बियामधे झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या वेळी ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या व्लादा या व्यक्तीभोवती या चित्रपटाची कथा केंद्रित आहे.

 

 

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar

 

 


(Release ID: 1554090) Visitor Counter : 87


Read this release in: English