माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रोम चित्रपट महोत्सवात वाढता लोक सहभाग- फ्रान्सिस्का व्हिआ
Posted On:
27 NOV 2018 6:59PM by PIB Mumbai
पणजी, 27 नोव्हेंबर 2018
भारत आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासमवेत अधिक सहयोगासाठी आपण उत्सुक आहोत यासाठी शक्य त्या मार्गांचा अभ्यास करुन रसिक आणि समिक्षकांना नव्या गोष्टी सादर करता येतील असे लॉरा डेली कोली यांनी सांगितले. रोम चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या ‘सिनेमा पर रोम’ या प्रतिष्ठानच्या लॉरा या उपाध्यक्षा आहेत. चित्रपट दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा आणि ‘सिनेमा पर रोम’ प्रतिष्ठानच्या महाव्यवस्थापक फ्रान्सिस्का व्हिआ यांच्या समवेत गोव्यात इफ्फीमधे संयुक्त पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. जागतिक चित्रपट क्षेत्रात भारतीय चित्रपटांना विशेष स्थान आहे असे त्या म्हणाल्या. रोम चित्रपट महोत्सवाचे महत्व वाढत असून प्रेक्षक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची या महोत्सवाविषयी उत्सुकता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
2020 मधे फेडरिको फेलीनी यांची जन्मशताब्दी आयोजित करण्यात आली असून या भव्य आयोजनासाठी इटलीचे नागरिक एकत्र येत असल्याचे ते म्हणाले. नवी पिढी तयार होत असून आपल्या प्राचीन संस्कृतीशी दृढ नाते राखणे महत्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.
भारतीय चित्रपट महोत्सवांसमवेत सहयोग करणे इटलीसाठी महत्वाचे आहेत तसेच आशिया आणि आशियाई चित्रपट आमच्यासाठी महत्वाचे आहेत असे फ्रान्सिस्का व्हिआ यांनी सांगितले.
प्रख्यात चित्रपट निर्माते फेर्डिको फेलीनी, अकीरा कुरोसावा यांचा उल्लेख करत दिग्ग्जांचे कार्य त्यांच्या मृत्यूनंतरही नेहमीच स्मरणात राहते असे राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी सांगितले.
रोम चित्रपट महोत्सवाविषयी बोलतांना हा महोत्सव सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आला होता आणि त्याला मोठा प्रतिसादही लाभल्याचे ते म्हणाले. युरोपमधे विशेषत: इटलीमधे चित्रपट आणि त्या संदर्भातली योग्य दिशा देण्यात पत्रकारितेची महत्वाची भूमिका असते. पत्रकारितेमुळे चित्रपटाला चळवळीचे स्वरुप प्राप्त होऊ शकते असे त्यांनी नमूद केले.
पार्श्वभूमी:-
लॉरा डेली कोली -
या पत्रकार आणि चित्रपटविषयक अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत.
फ्रान्सिस्का व्हिआ-
चित्रपट आणि चित्रपट महोत्सवांच्या कार्याविषयी व्हिआ यांची उत्तम जाण असून सांस्कृतिक व्यवस्थापक म्हणून त्यांचा अनुभव दांडगा आहे.
राकेश ओम प्रकाश मेहरा-
मेहरा हे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. ‘रंग दे बसंती’, ‘दिल्ली-6’, ‘भाग मिल्खा भाग’ यासारख्या समिक्षकांच्या आणि रसिकांच्या पसंतीला उतरलेल्या चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचा ‘मेरे प्यारे प्रायमिनिस्टर’ हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमधे रोम चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला.
B.Gokhale/N.chitale/P.Malandkar
(Release ID: 1554051)
Visitor Counter : 113