माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय सिनेमांचा दर्जा वाखाणण्याजोगा, भारतीय सिनेमांच्या मूल्यानुसार अमेरिकन सिनेमा दर्जा वाढविण्याच्या प्रयत्नात : मीड-फेस्ट चित्रपट दिग्दर्शक मॅथ्यू वाइल्डर

Posted On: 25 NOV 2018 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2018

 

भारतीय चित्रपट आमच्यासाठी नेहमीच दर्जेदार असून भारतीय चित्रपटांमधून प्रतित होणाऱ्‍या मूल्यांची पातळी गाठणे अमेरिकन चित्रपटांना नेहमीच शक्य होत नाही असे रिगार्डिंग द केस ऑफ जोन ऑफ आर्कया इफ्फीमधल्या मीड फेस्टीवल चित्रपटाचे दिग्दर्शक मॅथ्यू वाइल्डर यांनी सांगितले. भारतीय चित्रपट आमच्यासाठी प्रेरणादायी असतात असे ते पत्रकार परिषदेला संबोधित करतांना म्हणाले. चित्रपट कलावंत ‍ख्रिस्तोफर मॅथ्यू कूक यावेळी उपस्थित होते.

वाइल्डर यांच्या चित्रपटाचा 24 नोव्हेंबर 2018 रोजी पणजीत वर्ल्ड प्रिमियर झाला.

द ट्रायल ऑफ द जोन ऑफ आर्कही कालातीत कथा असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेतील शाळांमध्ये झालेल्या गोळीबारांच्या घटनांनंतर या चित्रपटाची कथा गवसल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात भविष्यातील अमेरिका दाखवण्यात आली असून, तिथे देशांतर्गत दहशतवाद आणि इसिस ही दहशतवादी संघटना एकत्रित कार्य करतांना दिसतात. या चित्रपटातील संवाद अमेरिकेतल्या सध्याच्या राजकीय स्थितीशी साधर्म्य साधतात असे वाइल्डर यांनी सांगितले. चित्रपटात जोनची भूमिका करणाऱ्या कलाकाराने ऐन वेळी माघार घेतल्याने निकोल हिला केवळ सहा दिवसच या भूमिकेची तयार करण्यासाठी मिळाले मात्र ती या भूमिकेत चपखल बसली आहे असे वाइल्डर म्हणाले. इफ्फीमध्ये या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचेही त्यांनी सांगितले.

पार्श्वभूमी:-

फ्रान्समधील कॅथलिक संत आणि हुतात्मा झालेल्या जोन ऑफ आर्क यांनी 14 व्या शतकात इंग्लडच्या अधिपत्याखालून फ्रान्सला स्वतंत्र करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.  रिगार्डिंग द केस ऑफ जोन ऑफ आर्क या चित्रपटात उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची कथा आहे. हे सर्वजण अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन धर्मीय जोन या गूढ दहशतवादी स्त्रीच्या प्रभावाखाली असतात. देवाचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगून ती या कार्यकर्त्यांना सहकारी इमारतीवर हल्ले करण्याचे आदेश देते. जोनला अटक करुन तिच्यावर देशांतर्गत दहशतवादासंदर्भात खटला चालवला जातो.

मॅथ्यू वाइल्डर यांनी अमेरिकेतल्या ख्यातनाम चित्रपट निर्मात्यांसाठी लेखन केले आहे. त्यांनी 2016 मधल्या डॉग इट डॉगया चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

‍ख्रिस्तोफर मॅथ्यू कूक हे डॉग इट डॉग, आवर्सआणि टू गन्सया चित्रपटातील भूमिकांसाठी नावाजले गेले आहेत.

 

 

B. Gokhale/J.Patankar/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553980) Visitor Counter : 104


Read this release in: English