माहिती आणि प्रसारण मंत्रालय

एव्हर्नो ही धाडसी वास्तववादी आणि पौराणिक कथा: मार्कोस लोएझा

Posted On: 26 NOV 2018 7:34PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्हेंबर 2018

 

प्रत्येकाच्या अंर्तमनात एक भीती आणि चिंता दडलेली असते. त्यावर मात करण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज असते. काही व्यक्ती यासाठी प्रवासाचा मार्ग निवडत अज्ञात प्रदेशात स्वत:ला झोकून देतात. गोव्यातल्या इफ्फीमधे वर्ल्ड पॅनोरमामधे दाखवण्यात आलेल्या एव्हर्नोया चित्रपटात एका व्यक्तीचा धाडसी प्रवास रंगवण्यात आला आहे. ॲन्डेस पर्वतात एव्हर्नो या ठिकाणी जीवंत माणसांबरोबरच मृतात्म्यांचेही अस्तित्व आहे असा तिथल्या रहिवाशांचा विश्वास आहे. या थरारक प्रवासात पौराणिक आणि वास्तवता यांची सांगड असून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आपल्यातल्या भीतीचा आणि शत्रूचाही नाश करायचा आहे.

आपला चित्रपट हा थरारक, वास्तव आणि पौराणिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटाला भारतात कसा प्रतिसाद मिळतो हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितले. बोलीव्हियन चित्रपट हे भारतीय चित्रपटांपेक्षा छोटे आणि संगीतावर कमी भर असलेले असतात असे मार्कोस यांनी सांगितले. ग्रीक पुराण कथा आणि संस्कृतीवर आधारित आपला पुढचा चित्रपट असेल अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1553929) Visitor Counter : 82


Read this release in: English