माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपट म्हणजे कथा सांगणे आणि ती प्रभावीपणे साकारणे : मेधप्रणव पोवार
Posted On:
26 NOV 2018 7:26PM by PIB Mumbai
पणजी, 26 नोव्हेंबर 2018
राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर आपल्या चित्रपटाची इफ्फीसाठी झालेली निवड यामुळे जबाबदारी अधिकच वाढल्याची भावना ‘भर दुपारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील कपुरे यांनी व्यक्त केली. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीमधे ‘हॅपी बर्थ डे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मेधप्रणव पोवार यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आशय हा चित्रपटाचा महत्वाचा घटक असल्याचे सांगून आशय सादर करण्यासाठी प्रत्येक माध्यमाचा स्वत:चा मार्ग असतो. दूरचित्रवाणी हे क्लोज अप चे माध्यम तर चित्रपट हे वाईड शॉट चे माध्यम आहे. दोघांसाठी आशय समानच आहे असे त्यांनी सांगितले.
‘हॅपी बर्थ डे’ ही वडील आणि मुलाची कथा आहे. लहानपणी आपले आई-वडील आपल्यासाठी काय त्याग करतात. याबाबत आपल्याला जाणीव नसते या चित्रपटात यावर आधारित वडील आणि मुलाची कथा साकारण्यात आली आहे. चित्रपट म्हणजे कथा सांगणे आणि ती प्रभावीपणे सादर करणे असा अर्थ असून उत्तम कथा असल्यास ती कोणत्याही माध्यमात सहजपणे सादर करता येते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी मुलाची भूमिका साकारण्यासाठी कलाकाराची निवड करणे अतिशय कठीण काम होते असे ते म्हणाले. लघुपटांना चित्रपटगृह मिळणे कठीण असले तरीही अशा लघुपटांना छोट्या शहरात लोकप्रियता मिळत असल्याने भारतात त्यांचे भवितव्य उज्वल आहे असे मत दोनही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केले.
B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1553926)
Visitor Counter : 218