माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रसिद्ध संवाद लेखक सलीम खान यांना इफ्फी 2018 च्या सांगता समारंभात ‘इफ्फी’ विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार
Posted On:
26 NOV 2018 4:59PM by PIB Mumbai
पणजी, 26 नोव्हेंबर 2018
गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार असून 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि शाल या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी आज ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

24 नोव्हेंबर 1935 मध्ये इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अमाप लोकप्रिय झालेला ‘शोले’ हा चित्रपट, ‘दिवार’, ‘जंजीर’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या त्यांनी लिहिलेल्या पटकथा रसिकांच्या पसंतीला उतरल्या. अभिनेता आणि निर्माते म्हणूनही त्यांचे योगदान राहिले आहे.
B. Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1553887)
अभ्यागत कक्ष : 300