माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपट दृष्याधारीत कथाकथन असले पाहिजे – व्हीएत हेल्मर

Posted On: 24 NOV 2018 6:56PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्हेंबर 2018

 

49 व्या इफ्फी 2018 चित्रपट महोत्सवातील ‘द ब्रा’, ‘अ सेक्रेड गौचो’, ‘फिनिक्स’, ‘ऑट्सजडर’ आणि ‘नर्व्हस ट्रान्सलेशन’ या जागतिक पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी 24 नोव्हेंबर 2018 रोजी गोवा प्रसार माध्यमांना संबोधित केले.

‘द ब्रा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक व्हीएत हेल्मर यांनी सांगितले की, प्रेक्षकांशी संवाद हा सर्वात महत्वाचा असून, चित्रपटाच्या प्रत्येक खेळानंतर प्रेक्षकांशी संवाद साधणे फायदेशीर ठरु शकेल. आल्फ्रेड हिचकॉक यांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, चित्रपट हे दृष्याधारीत कथाकथन असले पाहिजे आणि संवाद दृष्यांचा परिणाम कमी करतात.

‘अ सेक्रेड गौचो’ हा चित्रपट गरीबांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका लोकप्रिय नायकावर आधारीत असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक जोआक्वीन पेड्रीट्टी यांनी सांगितले. हा चित्रपट विशिष्टरित्या त्यातील कथेवर आधारीत निर्मित केला आहे, असे ते म्हणाले. भारत आणि अर्जेंटिनामधील परंपरेचे प्रतिक असल्यामुळे इफ्फीमध्ये चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणे हे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘फिनिक्स’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कॅमिला स्ट्रॉम हेन्‌रीक्सन यांनी प्रत्येकाशी जोडला जाणारा चित्रपट कसा निर्मित करावा, या प्रश्नाचे उत्तर देतांना सांगितले की, जर चित्रपट निर्माती आपण काय करत आहोत, याविषयी स्पष्ट असेल तर ती प्रेक्षकांशी सहजच संवाद साधू शकेल.

‘ऑट्सजडर’ चे दिग्दर्शक ॲडम सिकोरा यांनी हा चित्रपट पोलंडमधल्या अतिशय कठीण कालखंडाविषयी असल्याचे सांगितले. या चित्रपटात 1980 मधील एक तरुण या समस्यांना कस तोंड देतो याची कथा मांडण्यात आली आहे. चित्रपट तुम्हाला काय देतो हे समजून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या भाषेशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जावा लागतो, असे ‘नर्व्हस ट्रान्सलेशन’ या चित्रपटाच्या छायाचित्रकार डेनिस व्हिक्टोरीया म्हणाल्या.

 

S.Tupe/J.Patankar/D. Rane



(Release ID: 1553757) Visitor Counter : 94


Read this release in: English