माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीत साजरा झालेल्या खास दिनी चित्रपट निर्मितीसाठी इच्छित स्थळ म्हणून झारखंडला प्राधान्य
पणजी, 24 नोव्हेंबर 2018
49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कालचा दिवस झारखंड राज्यासाठी समर्पित करण्यात आला होता. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, झारखंडचे पर्यटन मंत्री अमर कुमार बाऊरी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पणजी इथे हा विशेष दिवस साजरा करण्यात आला.
झारखंड राज्य आणि या राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इफ्फी महोत्सवाला येणाऱ्या चित्रपट रसिकांना झारखंडची कला, संस्कृती तसेच विशेष खाद्यपदार्थ यांची झलक अनेक दालनांमधून अनुभवता येत आहे. विशेषत: या राज्यातील हस्तकला आणि खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करुन घेत आहेत. 2016 मध्ये चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन दिल्याबद्दल विशेष पुरस्कार मिळालेल्या झारखंड राज्याची या वर्षीच्या इफ्फीमध्ये प्राधान्यकेंद्र राज्य म्हणून निवड झाली आहे. यंदा प्रथमच इफ्फीमध्ये ‘प्राधान्यकेंद्र राज्य’ विभाग सुरु करण्यात आला आहे. झारखंड सरकारच्या चित्रपट प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत किंवा राज्याची भाषा आणि बोली यामध्ये चित्रित झालेले सहा चित्रपट इफ्फी दरम्यान दाखवण्यात येत आहेत. या चित्रपटांमध्ये ‘बेगम जान’ (2017), ‘रांची डायरीज्’ (2017), ‘ए डेथ इन द गंज’ (2016), ‘मोर गाव, मोर देश’ (2018), ‘अजब सिंग की गजब कहानी’ (2017) आणि ‘पंचलाईत’ (2017) या चित्रपटांचा समावेश आहे. भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एमएसडी: द अनटोल्ड स्टोरी’ (2016) हा चित्रपट इफ्फीमध्ये खुल्या प्रेक्षागृहात दाखवण्यात येत आहे.
S.Tupe/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1553755)
Visitor Counter : 154