पंतप्रधान कार्यालय
अंबरीश यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
Posted On:
25 NOV 2018 11:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबरीश यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
‘अंबरीश त्यांच्या स्मरणीय अभिनयामुळे एक अभिनेता म्हणून तसेच राजकारणातील भरीव योगदानामुळे कायम स्मरणात राहतील. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ते कर्नाटकाच्या कल्याणासाठीचा बुलंद आवाज होते. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले आहे, त्यांचे कुटुंबिय आणि चाहते यांचे सांत्वन’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Tupe/J.Patankar/D. Rane
(Release ID: 1553748)
अभ्यागत कक्ष : 136