माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘टू द डेझर्ट’ या चित्रपटात परस्पर विरोधी भावनांचे चित्रण : उलसेस रॉसेल

पणजी, 23 नोव्हेंबर 2018

 

‘टू द डेझर्ट’ या चित्रपटाची प्रेरणा पॅटेगोनिया इथे झालेल्या खऱ्या अपहरणाच्या घटनेतून मिळाली, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक उलसेस रॉसेल यांनी सांगितले. 49 व्या इफ्फी दरम्यान रॉसेल आणि चित्रपटाच्या नायिका वॅलेंटीना बस्सी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

हा चित्रपट वास्तववादी बनवण्यासाठी पडिक घरांचे लोकेशन निवडण्यात आले होते, असे रॉसेल म्हणाले.

हवामानाच्या खराब स्थितीमुळे हे चित्रिकरण अत्यंत कठीण होते, असा अनुभव वॅलेंटीनाने सांगितले.

इफ्फीच्या वर्ल्ड पॅनोरमा विभागात या चित्रपटाची निवड झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाल्याचे रॉसेल यांनी सांगितले.

वॅलेंटीनाने यावेळी तिच्या भूमिकेविषयी माहिती दिली. चित्रपटात तिने साकारलेली नायिका, जुलिया या अपहरण नाट्यात परस्पर विरोधी भावनिक कल्लोळांचा सामना करते. त्यामुळे ही भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक होते, असे तिने सांगितले.

 

 

 

B. Gokhale/R.Aghor/D. Rane


(Release ID: 1553697)
Read this release in: English