माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपटाच्या कथेची मुळे क्यूबन वास्तवात दडलेली असून, चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरील समकालिन वास्तवता दर्शवितो –रॉड्रिगो बॅरिउसो
‘माईने’ लोकांशी जोडण्याबाबत आहे – मॅथ्यू ब्राऊन
तृतीयपंथीयांच्या मुद्यांवर बोलले जाणे अपेक्षित, हा चित्रपट या समस्येवर संवाद साधू शकतो – सीवम
पणजी, 22 नोव्हेंबर 2018
‘अ ट्रान्सलेटर’ हा चित्रपट माझ्या कुटुंबातल्या अत्यंत वैयक्तिक गोष्टीवर आधारीत आहे. चित्रपटाच्या कथेची मुळे क्यूबन वास्तवात दडलेली आहेत, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक रॉड्रिगो बॅरिउसो यांनी सांगितले. इफ्फी महोत्सवात संध्याकाळी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्पर्धात्मक विभागात या चित्रपटाचा समावेश आहे.

आपल्या वडिलांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. अशा प्रकारच्या कथानकासाठी असा मंच उपलब्ध होणे, हाच एक पुरस्कार असल्याच्या भावना रॉड्रिगो यांनी व्यक्त केल्या. या चित्रपटाला यंदा शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन गॉब्लेट पुरस्कार मिळाला आहे.
इफ्फी महोत्सवात वर्ल्ड पॅनोरमाअंतर्गत दाखवण्यात आलेला ‘माईने’ चित्रपट मॅथ्यू ब्राऊन यांनी दिग्दर्शित केला आहे. भावनांची गुंतागुंत, अंतर्मुखता, आत्मशोध याबद्दल हा चित्रपट आहे. लोकांशी जोडणारा हा चित्रपट असल्याचे ब्राऊन यांनी सांगितले. विवाहित स्पॅनिश महिलेच्या आत्मशोधाच्या प्रवासाची ही कथा आहे.

तृतीयपंथीयांविषयीच्या प्रश्नांवर बोलले गेले पाहिजे आणि हा चित्रपट एक प्रयत्न असल्याचे ‘रुभा’ या द्वैभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शक लेनीन सीवम यांनी सांगितले. इफ्फी महोत्सवात वर्ल्ड पॅनोरमाअंतर्गत हा चित्रपट दाखवण्यात आला. तरुण आशियाई तृतीयपंथी महिला ‘रुभा’ आणि एक विवाहित पुरुष यांची ही प्रेमकथा आहे. तमिळ लघुकथेतून प्रेरणा घेऊन श्रीलंकेत मुळं असलेल्या कॅनेडिअन दिग्दर्शकाचा हा चित्रपट आहे.

तृतीयपंथी सामान्य व्यक्तींसारखेच असतात, असे या चित्रपटात ‘रुभा’ची भूमिका साकारणाऱ्या अम्रीत संधूने सांगितले.

लेनीन सीवम यांनी अनेक लघुपट दिग्दर्शित केले असून ‘1999’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
(1)L44J.JPG)
B. Gokhale/S. Kakade/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1553664)
आगंतुक पटल : 119
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English