मंत्रिमंडळ
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील कराराबाबत मंत्रिमंडळाला देण्यात आलेली माहिती
Posted On:
22 NOV 2018 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील कराराबाबत अवगत करण्यात आले. या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उज्बेकिस्तानचे राष्ट्रपति शौकत मिरायोयेवयांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 1 ऑक्टोबर 2018 रोजी भारताकडून विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि उजबेकिस्तान कडून त्यांचे नवोन्मेष विकास मंत्री अब्राहिम अब्दुरखमानोव यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
लाभः-
या करारामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरु होईल कारण दोन्ही देशांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील परस्पर हिताच्या पूरक बळकटीमुळे लाभ होईल. या कराराचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे. हितधारकांमध्ये वैज्ञानिक संघटनांचे संशोधक, शिक्षणतज्ञ, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसेच भारत-उज्बेकिस्तानच्या उद्योगांचा समावेश आहे. सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रात कृषि आणि अन्न विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान , अप्लाईड मैथेमेटिक्स, डाटा विज्ञान आणि तंत्रज्ञान , वैद्यकीय तंत्रज्ञान , धातु विज्ञान, जैव तंत्रज्ञान , भौतिक शास्त्र आणि एस्ट्रोफिजिक्स, ऊर्जा, जल, हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांची निवड करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1553520)