आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

“ऍटमॉसफिअर अँड क्लायमेट रिसर्च मॉडेलिंग ऑबझर्विंग सिस्टिम्स अँड सर्विसेस” या एकछत्री योजना अंमलबजावणीसाठी, 2017-20 दरम्यान उप-योजना सुरु ठेवायला आणि एन.एफ.ए.आर.च्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 22 NOV 2018 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने "ऍटमॉसफिअर अँड क्लायमेट रिसर्च मॉडेलिंग ऑबझर्विंग सिस्टिम्स अँड सर्विसेस " या एकछत्री योजनेच्या ९ उप-योजना 2017-2020  पर्यत सुरु ठेवायला मंजुरी दिली आहे. यासाठी  1450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूविज्ञान मंत्रालय , भारतीय हवामानशास्त्र विभाग ( IMD), इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरोलॉजि (IITM), नॅशनल सेन्टर फॉर मिडीयम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF),आणि इंडियन नॅशनल सेन्टर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्विस (INCOIS) या संस्थांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करेल.

नॅशनल फॅसिलिटी फॉर एअरबोर्न रिसर्च (NFAR) स्थापन करायलाही मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. यासाठी  2020-21 आणि त्यानंतरच्या कालावधीत 130 कोटी रुपये खर्च येणार आहे.

प्रभाव:

या योजनेमुळे हवामान, तापमान आणि महासागर संबंधी सुधारित अंदाज आणि सेवा उपलब्ध होतील आणि त्यातून सरकारी हवामान सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी-हवामान सेवा, हवाई सेवा, पर्यावरण देखरेख सेवा , पर्यटन, तीर्थयात्रा, वीज निर्मिती, जल व्यवस्थापन, क्रीडा आदी सेवांना लाभ होईल.

रोजगाराच्या संधीत वाढ :

आवश्यक प्रशासकीय साहाय्यासह वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर लागतील, त्याद्वारे रोजगार निर्मिती शेवटच्या घटकापर्यंत हवामान आधारित सेवा पोहोचेल याकडे लक्ष देण्यासाठी  भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी विज्ञान केंद्रे, विदयापीठे आणि स्थानिक महापालिका यांच्याकडे जबाबदारी, त्याद्वारे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार.

विवरण:-

एसीआरओएसएस योजना भू विज्ञान मंत्रालयाशी संबंधित असून चक्रीवादळ, वादळ, उष्माघात, गडगडाटासह मुसळधार पाऊस यांसारख्या समस्या यात येतात.

यापैकी प्रत्येक मुद्दा एसीआरओएसएस एकछत्री  योजने अंतर्गत, नऊ उप-योजनामध्ये समाविष्ट आहे. आणि वरील चार संस्थांच्या माध्यमातून त्याची अंमलबाजवणी केली जाते.

एसीआरओएसएस योजना 9 उप-कार्यक्रमांची बनली आहे, जी  बहु-शाखीय  आणि  बहु-संस्‍था स्वरूपाची आहे. आईएमडी, एचआईएम, एनसीएमआरडब्ल्यूएफ आणि  आईएनसीओआईएस च्या माध्यमातून राबवली जाईल.

एसीआरओएसएस योजनेचा उद्देश्‍य समाजाच्या कल्याणासाठी एक विश्वसनीय हवामान अंदाज वर्तवणे हा आहे. म्हणूनच , कृषी-हवामान सेवा, हवाई सेवा, पर्यावरण देखरेख सेवा , पर्यटन, तीर्थयात्रा,  पर्वतारोहण यासारख्या सेवा शेवटच्या वापरकर्त्यापर्यंत वेळेवर पोहचवण्यासाठी नियमित विश्लेषण, संशोधन आणि विकास , प्रभावी दूरसंवाद धोरण याचा वापर करून हवामान अंदाजात सुधारणा घडवून आणणे हा यामागचा उद्देश आहे

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553504) Visitor Counter : 133


Read this release in: English