मंत्रिमंडळ

गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंती समारंभाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 22 NOV 2018 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शीख धर्मगुरू गुरु नानक यांच्या 550व्या जयंती उत्सवाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षी येणाऱ्या या जयंतीनिमित्त देशभरात आणि जगातही  उत्सव तसेच विविध समारंभ साजरे केले जाणार आहेत. राज्य सरकारे आणि परदेशातील भारतीय दूतावास या जयंती उत्सवात सहभागी  होतील. गुरुनानक देव यांनी  जगाला प्रेम, शांती, समानता आणि बंधुत्वाची शिकवण दिली असून ती  चिरंतन आहे.

आजच्या बैंठकीत घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय:

कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचा विकास-

गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नायक पासून ते आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या,  कॉरिडॉर चा   विकास करणे. यामुळे भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानमधे रावी नदीकिनारी असलेल्या साहिब कर्तारपूर यांच्या गुरुद्वारा दरबारला भेट देता येईल.

केंद्र  सरकारच्या निधीमधून हा कॉरिडॉर विकसित केला जाईल.

सुलतानपूर लोधीचा विकास:

गुरु नानक देव यांच्या जीवनकार्याशी संबंधित ऐतिहासिक गाव सुलतानपूरचा ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून विकास केला जाईल. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर हा विकास केला जाणार असून, त्यात ऊर्जा सक्षमीकरण हा महत्वाचा घटक असेल. गुरुनानक यांच्या आयुष्याचे वर्णन करणारी पिंड बाबे नानक दाहे स्थळ विकसित केले जाणार आहे.

आंतरश्रद्धा अध्ययनकेंद्र आणि परदेशी विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र विकसित करणे.

अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठात आंतर-श्रद्धा अध्ययनकेंद्र विकसित केले जाणार आहे. त्याशिवाय इंग्लंड आणि कॅनडा येथील विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र विकसित केले जाणार आहे. गुरु नानक देव यांच्या आयुष्यावर एक चर्चासत्र नवी दिल्लीत आयोजित केले जाईल.

देशभर आणि जगात जयंती उत्सव साजरा होणार-

गुरु नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि परदेशातील भारतीय दूतावास यांनाही कार्यक्रम साजरे करण्याची विनंती केली जाणार आहे. 

नाणी आणि टपाल तिकिटाचे अनावरण-

यानिमित्त भारत सरकारतर्फे, विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे.

धार्मिक कार्यक्रम आणि प्रकाशने-

यानिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. दूरदर्शनवरुन गुरु नानक देव यांच्यावरील कार्यक्रम आणि गुरुबानीचे प्रक्षेपण होणार आहे. गुरु नानक जी यांचे साहित्य जागतिक भाषांमध्ये प्रकाशित करण्याची विनंती युनेस्कोला केली जाणार आहे.

 

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1553477)
Read this release in: English