राष्ट्रपती कार्यालय

व्हिएतनाम राष्ट्रीय संसदेला राष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 20 NOV 2018 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  नोव्हेंबर 2018

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्हिएतनाम दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी हनोई येथे व्हिएतनामच्या राष्ट्रीय संसदेला आज संबोधित केले. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांशी त्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली आणि प्रतिनिधी स्तरावरही चर्चा केली. यावेळी उभय देशादरम्यान चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

व्हिएतनामचे माहिती आणि दूरसंवाद मंत्रालय आणि भारताचे दूरसंवाद मंत्रालय यांच्यात करार झाला. भारतीय उद्योग महासंघ आणि व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री यांच्यातही एक करार झाला.

सागरी क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. सागरी सुरक्षा, चाचेगिरी, सागरी मार्गाने अंमली पदार्थांची वाहतूक या दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांच्या परस्परांच्या बंदराला नियमित भेटी यामुळे उभय देशातले सहकार्य आणखी वाढीला लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्हिएतनामच्या पंतप्रधानांचीही राष्ट्रपती राम नाथ कोविंद भेट घेणार आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553301) Visitor Counter : 143


Read this release in: English