पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

129 जिल्ह्यातील शहर गॅस वितरण प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमीपूजन

Posted On: 20 NOV 2018 2:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  नोव्हेंबर 2018

 

129 जिल्ह्यातल्या 65 भौगोलिक विभागातल्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन अर्थात शहर गॅस वितरण प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात 22 नोव्हेंरबला दुपारी चार वाजता होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात रिमोटद्वारे पंतप्रधान या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 19 राज्यातल्या प्रत्येक भौगोलिक विभागातही स्थानिक स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. या प्रकल्पामुळे 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या आणि देशातल्या जवळजवळ निम्म्या लोकसंख्येला सुलभ, पर्यावरण स्नेही आणि किफायतशीर नैसर्गिक गॅस उपलब्ध होणार आहे.

नवव्या शहर गॅस वितरण बोली फेरी अंतर्गत, यातले 129 जिल्हे आहेत.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 14 राज्यातल्या 124 जिल्ह्यातल्या 50 भौगोलिक विभागात पसरलेल्या 10 व्या शहर गॅस वितरण बोली फेरीचा प्रारंभ करणार आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553275) Visitor Counter : 70


Read this release in: English