वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कृषी क्षेत्रातील नवसंशोधन ही काळाची गरज- सुरेश प्रभू

Posted On: 16 NOV 2018 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2018

 

जगभरातील देश हवामान बदलाच्या समस्येला तोंड देत असून कृषी क्षेत्रातील नवसंशोधन ही काळाची गरज-आहे असे केन्द्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु म्हणाले . ते आज नवी दिल्लीत कृषि स्टार्ट-अप्स द्वारा संशोधन यावर आयोजित अंतर्राष्ट्रीय परिषद आणि  पुरस्कार समारंभात बोलत होते.

जागतिक लोकसंख्या वाढत असल्यामुळे पुढील काही वर्षात अन्नधान्याची मागणी वाढेल आणि यासाठी मर्यादित सुपीक जमिनीत आणि कमी पाण्याचा वापर करत अन्नधान्याचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी कृषी स्टार्टअप्सची गरज आहे असे ते म्हणाले.

वाणिज्य मंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रात स्टार्ट-अप्ससाठी अमाप संधी आहेत ज्या आता प्रामुख्याने विचार मंच आणि निर्मितीपर्यंत सीमित आहेत.

सुरेश प्रभु यांनी कृषि स्टार्ट-अप्सना अधिक नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन केले. सरकार स्टार्ट-अप्सच्या विकासासाठी सुविधा पुरवण्यासाठी एका व्यापक धोरणावर काम करत आहे.

सुरेश प्रभु यांनी विविध श्रेणीतील कृषि स्टार्ट-अप्सना नवोन्मेष पुरस्कार प्रदान केले.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 



(Release ID: 1552989) Visitor Counter : 95


Read this release in: English