उपराष्ट्रपती कार्यालय
समजूतदार, प्रेमळ आणि सुसंवादी समाज घडवणारे परिवर्तनात्मक घटक बना- नायडू
समाजाच्या उन्नती आणि विकासाप्रति उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना जमनालाल बजाज पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
Posted On:
15 NOV 2018 7:32PM by PIB Mumbai
मुंबई, 15 नोव्हेंबर 2018
आपण सर्वांनी समजूतदार, प्रेमळ आणि सुसंवादी समाजाची निर्मिती करण्यासाठी परिवर्तन घडवून आणणारे घटक बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. ते आज मुंबईत जमनालाल बजाज पुरस्कार समारंभात उपस्थितांना संबोधित करत होते.

लोकांच्या मानसिकतेत सुधारणा आणि बदल घडवून आणण्यासाठी जमनालाल बजाज यांच्यासारख्या सामाजिक भान असणाऱ्या नेत्यांकडून आपण प्रेरणा घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
समाज, ग्रामीण समुदाय आणि देशाच्या उन्नती आणि विकासाप्रति नि:स्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. एकूण तीन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. 10 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विधायक कार्य श्रेणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल उत्तराखंडच्या तेहरी गढवालचे गांधीवादी आणि सामाजिक कार्यकर्ते धूम सिंग नेगी यांना यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर श्रेणीतील पुरस्कार गुजरातच्या नॅशनल सेंटर फॉर पिपल्स ॲक्शन इन डिझास्टर प्रिपेअर्डनेसचे सहसंचालक रुपल देसाई आणि राजेंद्र देसाई यांना विभागून देण्यात आला.
महिला आणि बालविकास आणि कल्याण श्रेणीतील महिलांसाठीचा विशेष पुरस्कार राजस्थानच्या कोरा येथील श्री करनी नगर विकास समितीच्या निमंत्रक प्रसन्ना भंडारी यांना देण्यात आला.
भारताबाहेर गांधीवादी विचारांचा प्रसार केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेच्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर संशोधन आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. क्लेबोर्न कार्सन यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री विनोद तावडे, जमनालाल बजाज फाउंडेशनचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
2018 च्या पुरस्कार विजेत्यांविषयी
UBBZ.jpg)
धूम सिंह नेगी
धूम सिंह नेगी हे उत्तराखंडच्या हिमालयीन प्रांतातील सामाजिक कार्यकर्ते असून गुरुजी या नावाने ते ओळखले जातात. उत्तराखंड मधील अनेक चळवळींचे त्यांनी नेतृत्व केले आहे.
G2TV.jpg)
रुपल देसाई आणि राजेंद्र देसाई
रुपल देसाई या वास्तुविद्या विशारद आहेत तर राजेंद्र देसाई हे स्ट्रक्चरल इंजिनिअर आहेत. 1984 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकीर्द सोडून त्यांनी ग्रामीण भारतासाठी काम करायचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील जनतेच्या उन्नतीसाठी आपल्या तंत्रज्ञान विषयक ज्ञानाचा वापर त्यांनी ग्रामीण भागासाठी केला.

प्रसन्ना भंडारी
प्रसन्ना भंडारी या कोटा येथील श्री करनी नगर विकास समितीच्या निमंत्रक आणि मार्गदर्शक आहेत. अनाथ मुले, वेश्यांची मुले, नैराश्यग्रस्त महिला आणि मुली तसेच वयोवृद्धांच्या कल्याणासाठी त्या काम करतात.
EL3W.jpg)
डॉ. क्लेबोर्न कार्सन
गांधीवादी विचारांना मार्टिन ल्यूथर किंग आणि आफ्रिकन अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीवरील प्रभाव जाणून घेण्यात डॉ. क्लेबोर्न कार्सन यांना विशेष रुची होती. त्यातूनच 2018 मध्ये त्यांनी गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावरील अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली.
जमनालाल बजाज फाउंडेशन पुरस्कारांविषयी
गांधीवादी विचार आणि जमनालाल बजाज यांच्या तत्वांचा प्रसार करण्याचे कार्य जमनालाल बजाज फाउंडेशन करत आहे. विधायक कार्य, ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर (1978) आणि महिला आणि बालविकास कल्याणासाठी (1980) उल्लेखनीय कार्य केलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो. जमनालाल बजाज यांच्या पत्नी जानकीदेवी बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय नागरिकांना हे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1988 सालापासून भारताबाहेर गांधीवादी विचारांचा प्रसार करणाऱ्या परदेशी नागरिकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.
N.Sapre/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1552920)