रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नवीन भारताच्या निर्मितीसाठी नवीन महामार्ग आणि नवीन रस्ते- गडकरी

प्रविष्टि तिथि: 15 NOV 2018 3:18PM by PIB Mumbai

मुंबई, 15 नोव्हेंबर 2018

 

पायाभूत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सरकारची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवीन महामार्ग आणि नवीन रस्ते बांधत आहे असे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत टोल-ऑपरेट-ट्रान्सफर(टीओटी) प्रकल्पांच्या दुसऱ्या समुहावरील रोड शोमध्ये बोलत होते. या अंतर्गत, क्रियाशील राष्ट्रीय महामार्गांचे मुद्रीकरण केले जाईल. या मॉडेलच्या पहिल्या टप्प्यात दीड अब्जची गुंतवणूक झाली होती. या दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली.

टीओटीद्वारे गुंतवणुकदारांना कोणतीही जोखीम न घेता निश्चित परतावा मिळेल. भारतीय स्टेट बँकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 3.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे.

रालोआ सत्तेत येण्यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग प्रतिदिन 2 कि.मी होता, तो आता प्रतिदिन 28 किमीवर गेला असून आगामी काळात तो प्रतिदिन 45 किमीपर्यंत नेण्याचे सरकारचे उदिृष्ट असल्याचे गडकरी म्हणाले.

वाहन निर्मिती आणि बंदर क्षेत्रात चांगली वाढ होत असून आगामी काळात आणखी वाढ होईल असे ते म्हणाले. मात्र रस्त्यांचे परिचालन करणाऱ्यांनी रस्ते देखभाल आणि सुरक्षेबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. पाच लाख अपघात आणि दीड लाख अपघाती मृत्युमुळे रस्ते सुरक्षा ही चिंतेची बाब बनल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारांबरोबर रस्ते बांधणीत पुढाकार घेण्यासाठी खासगी गुंतवणुकदारांना सरकार सर्व ती मदत करेल असे गडकरी म्हणाले.

 

N.Sapre/S.Kane/P.MALANDKAR

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1552840) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English