पंतप्रधान कार्यालय

जीएसएलव्ही एमके 3-डी 2 या प्रक्षेपक यानाद्वारे जीसॅट -29 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडल्याबद्दल इसरोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 14 NOV 2018 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2018

 

जीएसएलव्ही एमके 3 –डी 2 या प्रक्षेपक यानाद्वारे जीसॅट - 29 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडल्याबद्दल इसरोच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, जीएसएलव्ही एमके 3-डी 2 या प्रक्षेपक यानाद्वारे जीसॅट -29 उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आपल्या वैज्ञानिकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

भारतीय प्रक्षेपक यानाने आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह अंतराळात सोडून एक नवीन विक्रम प्रस्थापित करत दुहेरी यश मिळवले आहे.

हा उपग्रह आपल्या देशातील दुर्गम भागात दळणवळण आणि इंटरनेट सेवा पुरवेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1552828) Visitor Counter : 105


Read this release in: English