पंतप्रधान कार्यालय

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 13 NOV 2018 6:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2018

 

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे-

‘‘आसियान भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी 14 आणि 15 नोव्हेंबरला सिंगापूरला भेट देणार आहे. तसेच मी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी नेत्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहे.

आशिया सदस्य देशांबरोबर तसेच भारत प्रशांत क्षेत्राबरोबर आपले संबंध अधिक दृढ करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचे प्रतीक  या बैठकीतील माझा सहभाग आहे. अन्य आसियान आणि पूर्व आसियान शिखर परिषदेच्या नेत्यांबरोबर संवाद साधायला मी उत्सुक आहे.

14 नोव्हेंबरला सिंगापूर फिनटेक महोत्सवात प्रमुख भाषण देणारा पहिला राष्ट्रप्रमुख होण्याचा मान मला मिळणार आहे. जगातील आर्थिक तंत्रज्ञानावरील हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्यामुळे या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य दाखविण्यासाठी आणि संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी जागतिक भागीदारी करण्यासाठी हा महोत्सव हे योग्य व्यासपीठ आहे.

या माझ्या दौऱ्यात संयुक्त भारत-सिंगापूर हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी आणि विजेत्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळणार आहे. आपण जर योग्य प्रोत्साहन आणि पोषक परिसंस्था उपलब्ध करून दिली तर मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्यात जागतिक नेते बनण्याची क्षमता आपल्या युवकांमध्ये आहे, असा मला विश्वास आहे.

माझ्या या सिंगापूर दौऱ्यामुळे आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेच्या देशांबरोबर भागीदारी वाढवण्याला नव्याने गती मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

मी सिंगापूरला रवाना होत असून यंदा आसियानच्या अध्यक्ष पदाचा मान मला मिळाल्याबद्दल मी सिंगापूरचे हार्दिक अभिनंदन करतो  आणि आसियान आणि संबंधित शिखर परिषदांचे आयोजन यशस्वीपणे पार पडो यासाठी शुभेच्छा देतो.’’

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1552632) Visitor Counter : 78


Read this release in: English