पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान वाराणसीमध्ये - बहू आयामी टर्मिनल राष्ट्राला अर्पण ; मोठ्या रस्ते प्रकल्पाचे उदघाटन

Posted On: 12 NOV 2018 8:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीला भेट दिली. त्यांनी २४०० कोटी रुपये लागत मूल्य असलेल्या प्रकल्पांची आधारशीला ठेवली., तसेच विविध रस्ते प्रकल्पांचे उदघाटन केले.  पंतप्रधानांनी हे सर्व मोठे प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले .

त्यांनी गंगा नदीवरील बहू आयामी  टर्मिनल राष्ट्राला  समर्पित केले व  प्रथम  कार्गो कंटेनर प्राप्त केले. त्यांनी वाराणसी रिंग रोड फेज- 1 चे उद्घाटन केले आणि एनएच -56 च्या बाबतपूर-वाराणसी  या विभागाच्या  चार  मार्गाचा  विकास व बांधकाम केले. वाराणसीतील इतर विकास प्रकल्पांचीही  त्यांनी आधारशीला ठेवली.

मोठ्या आणि उत्साहवर्धक समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान या प्रसंगी म्हणाले की, काशी, पूर्वांचल, आणि  पूर्वेकडील भारतासाठी आजचा दिवस  ऐतिहासिक आहे. आज संपूर्ण देश, करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक करीत असून, देशालासुद्धा आजचा दिवस अभूतपूर्व आहे. त्यांनी सांगितले की, आज झालेले  हे विकास कार्य दशकापूर्वी पूर्ण व्हायला हवे होते. वाराणसीसह संपूर्ण देश आत्ता या विकासाचा साक्षीदार आहे तसेच पुढील पिढीच्या पायभूत सुविधांचा दृष्टिकोन, कदाचित दळणवळणाच्या माध्यमांमध्ये परिवर्तन आणू शकतो. 

वाराणसीतील पहिल्या अंतर्देशीय कंटेनर नौकेच्या आगमनाचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, आत्ता  पूर्व उत्तर प्रदेश जलमार्गाद्वारे बंगालच्या खाडीशी जोडला गेला आहे.

त्यांनी रस्त्यांसह नमामी गंगेशी संबंधित प्रकल्पांचा आणि इतर अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला, ज्या प्रकल्पांची कोनशिला आज ठेवण्यात आली.

पंतप्रधानांनी सांगितले की, जलमार्गामुळे  वेळ आणि पैशाची बचत होईल.  रस्त्यावरची गर्दी कमी होईल तसेच  भीती कमी होईल. यामुळे  इंधन खर्च कमी होऊन, वाहन प्रदूषण हि कमी करण्यात  येणार आहे.

वाराणसीसह बाबतपुर विमानतळला जोडणारा रस्ता प्रवास, सुलभतेने पर्यटकांना आकर्षित करणारा ठरेल.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या चार वर्षांत आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने वाढल्या आहेत. ते म्हणाले की दूरदूरच्या विमानतळ, उत्तरपूर्वीच्या काही भागांमध्ये रेल्वे जोडणी, ग्रामीण रस्ते आणि महामार्ग हे केंद्र सरकारच्या ओळखचा एक भाग बनले आहेत.

नमामि गंगे प्रकल्पांतर्गत, पंतप्रधानांनी  २३००० कोटी रुपयांच्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. गंगा नदीच्या काठावरील  जवळपास सर्व खेडी हि हागणदारीमुक्त झाली आहेत. हा प्रकल्प हा केंद्र सरकारच्या गंगा नदी स्वच्छता मोहिमेचा एक भाग होता

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1552586) Visitor Counter : 90


Read this release in: English