पंतप्रधान कार्यालय

प्रथम विश्वयुद्धात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधानांनी  वाहिली  श्रद्धांजली

Posted On: 11 NOV 2018 1:07PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पहिल्या महायुद्धात  शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली. "आज पहिल्या भयंकर महायुद्धाला शंभर वर्ष  पूर्ण  झाली  असून,  आम्ही वचन दिल्याप्रमाणे, भारत यापुढेही, शांतता आणि बंधुत्वाच्या वातावरणात पुढे काम करण्याची प्रतिज्ञा करतो जेणेकरुन युद्धांमुळे झालेल्या मृत्यू आणि विनाशाची पुनरावृत्ती होणार नाही." असे पंतप्रधानांनी सैनिकांना श्रद्धांजली वाहताना सांगितले

पहिल्या विश्व युद्धात लढलेल्या आपल्या बहादुर सैनिकांचे  भारताला  स्मरण  आहे.  ते एक युद्ध वाहिली होते, ज्यात भारत थेट गुंतलेला नव्हता तरीही शांततेसाठी आमचे सैनिक जगभर लढले.

 फ्रान्समधील न्यूव्हे - चॅपेल मेमोरियलमध्ये आणि प्रथम विश्वयुद्धात भारताच्या भूमिकेशी संबंधित असलेल्या इस्रायलच्या हाइफाच्या स्मारकांमध्ये मला श्रद्धांजली अर्पण करण्याचा सन्मान मिळाला आहे. जेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारतात आले तेव्हा त्यांनी, "हैफा चौकातील तीन मुर्ती " येथे श्रद्धांजली अर्पण केली, असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/P.Kor

 



(Release ID: 1552445) Visitor Counter : 63


Read this release in: English