मंत्रिमंडळ

परदेशातील राष्ट्रीय तेल कंपन्यांकडून कर्नाटकचा पादुर धोरणात्मक पेट्रोलियम साठा भरायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 08 NOV 2018 11:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाने परदेशातील राष्ट्रीय तेल कंपन्यांकडून कर्नाटकचा पादूरस्थित पादुर धोरणात्मक पेट्रोलियम साठा (एसपीआर) भरायला मंजुरी दिली आहे. पादुर स्थित एसपीआर सुविधा एक भूमिगत दगडी गुहा आहे जिची एकूण क्षमता 2.5 मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) आहे. यात  चार कक्ष आहेत ज्यातील प्रत्येकाची क्षमता 0.625 एमएमटी आहे.

इंडियन स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिजर्व्स लिमिटेड (आईएसपीआरएल) ने तीन ठिकाणी  विशाखापट्टणम (1.33 एमएमटी), मंगलोर (1.5 एमएमटी) आणि  पादुर (2.5 एमएमटी) मध्ये एकूण  5.33 एमएमटी कच्च्या तेलाच्या साठयासाठी भूमिगत गुहांची निर्मिती करण्याबरोबरच ती सुरु देखील केली आहेत.  वित्त वर्ष 2017-18 साठी उपभोकता  आकडेवारीनुसार , एसपीआर कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण 5.33 एमएमटी क्षमतेसह सध्या भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या अंदाजे  95 दिवसांचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. वित्त वर्ष 2017-18 साठी उपभोक्ता आकडेवारीनुसार सरकारने ओडिशाच्या  चंडीखोल आणि  कर्नाटकच्या पादुर इथे 6.5 एमएमटी  अतिरिक्त एसपीआर सुविधाच्या स्थापनेसाठी जून 2018 मध्ये तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत  11.5 दिवसांची वाढ होण्याची आशा आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1552264) Visitor Counter : 146


Read this release in: English