मंत्रिमंडळ

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंतर्गत असलेल्या प्रगत मोटर इंधन तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रमात भारत सहभागी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आली

Posted On: 08 NOV 2018 10:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 मे 2018रोजी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) अंतर्गत प्रगत मोटर इंधन तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रमात भारत सहभागी झाल्याची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेअंतर्गत (IEA) चालवल्या जाणाऱ्या प्रगत मोटर इंधन तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रमाशी भारताचा 30 मार्च, 2017 पासून संबंध आहे.

 

तपशीलः

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने टीसीपीमध्ये सहभागी होण्याचे मुख्य उद्दिष्ट कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि वाहतूक क्षेत्रातील उच्च इंधन कार्यक्षमता साध्य करण्याच्या उद्देशाने प्रगत मोटर इंधन /पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे हे आहे. एएमएफ टीसीपी तंत्रज्ञान इंधनाचा अभ्यास करण्याची, वाहतूक क्षेत्रामध्ये नवीन /पर्यायी इंधनांची ओळख करून देते आणि इंधन क्षेत्रामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी संशोधन आणि विकासाला वाव देते.

एएमएफ टीसीपीमधील संशोधन आणि विकास कार्य "अॅनेक्स" नावाच्या स्वतंत्र प्रकल्पांअंतर्गत केले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये एएमएफ टीसीपीमध्ये अशा 50 हून अधिक अॅनेक्सिस सुरू करण्यात आल्या आहेत आणि बऱ्याच इंधनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या आणि ऑटोमोबाईल चाचणी एजन्सीज जसे आरएआरआय, सीआयआरटी, आयसीएटी यांच्याकडे स्वतःची उच्च दर्जाची संशोधन आणि विकास व्यवस्था असून त्या अशा अनेक्समध्ये उत्तम योगदान देऊ शकतील .

2015 च्या उर्जासंगमध्ये पंतप्रधानांनी 2022 पर्यंत देशातील उर्जेची आयात किमान 10% कमी करण्याचे निर्देश दिले होते.  त्यानंतर, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एम ओ पी आणि एनजी एक विस्तृत कृती योजना हाती घेतली. ज्यात जैवइंधन, प्रगत /पर्यायी इंधने आणि इंधन कार्यक्षमता यांची भूमिका महत्वाची ठरेल. एएमएफ टीसीपी सोबत काम केल्यामुळे उच्च कार्यक्षमता आणि कमी उत्सर्जनाच्या संदर्भात वाहतूक क्षेत्रासाठी उपयुक्त इंधनांची ओळख आणि उपयोजन करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी एमओपी आणि एनजीलामदत करेल.

भारत सरकारने अलीकडेच बायोफ्यूल्स -2018 वर राष्ट्रीय धोरण अधिसूचित केले आहे. या धोरणानुसार, 2 जी इथॅनॉल, बायो-सीएनजी, बायोमेथेनॉल, ड्रॉप-इन इंधने, डीएमई इत्यादीसारख्या प्रगत जैव ईंधन क्षेत्रात संशोधन आणि विकास वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पिकांचा कचरा, महापालिकांचा घन कचरा, औद्योगिक कचरा, कचरा वायू, अन्न कचरा, प्लास्टिक वगैरे विविध प्रकारच्या टाकावू पदार्थांपासून हे इंधन बनवता येईल. आज अनेक देशात वाहनांसाठी जैव इंधन वापराले जात असले तरी भारतात अद्याप ही सुरुवात व्हायची आहे. हे प्रगत इंधन सध्या आपल्या देशात प्राथमिक पातळीवर आहे ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या इंधनाला व्यवहार्य पर्याय बनवण्याच्या दृष्टीने विस्तृत संशोधन आणि विकास होणे आवश्यक आहे. एएमएफसोबत काम केल्यामुळे भारतात हे इंधन तयार होण्यासठी मदत होईल. अशा परिस्थितीत, प्रगत जैव ईंधन भारतात आणण्यासाठी सदस्य देशांचा अनुभव आणि एमओपी व एनजीचा भारताला अतिरिक्त फायदा होईल.

एएमएफ टीसीपीमध्ये सहभागी झाल्यामुळे संशोधानावरील खर्च विभाजित होऊ शकेल.   राष्ट्रीय संशोधन आणि विकास क्षमता अधिक मजबूत होतील  व्यावहारिक अंमलबजावणीसह, सर्वोत्तम पद्धत , संशोधकांची माहिती आणि लिंकिंग शोध बद्दलच्या माहितीची देवघेव होऊ शकेल.  सदस्य बनल्यानंतर भारत जीवाश्म ईंधन आयात करण्याच्या महत्वाच्या भूमिकेच्या दृष्टीने प्रगत{जैव ईंधन आणि इतर मोटार इंधनांमध्ये रस असलेल्या इतर क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकाससुरू करणार आहे

 

पार्श्वभूमीः

एएमएफ टीसीपी स्वच्छ आणि अधिक ऊर्जा कार्यक्षम इंधन व वाहन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्यासाठी देशांमध्ये सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच आहे. एएमएफ टीसीपीची कार्ये प्रगत मोटर इंधनांचा आर आणि डी, उपयोजन आणि प्रसाराविषयी आहेत आणि उत्पादन, वितरण आणि वापराशी संबंधित पैलू लक्षात घेऊन वाहतूक इंधन समस्या व्यवस्थित हाताळल्या जातात्त.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय,9 मे 2018रोजी सदस्य म्हणून AMF TCP सहभागी झालेआहे.एएमएफ टीसीपीचे इतर सदस्य देश अमेरिका, चीन, जपान, कॅनडा, चिली, इस्रायल, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, स्पेन, कोरिया गणराज्य, स्वित्झर्लंड आणि थायलंड हे आहेत.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1552263) Visitor Counter : 109


Read this release in: English