मंत्रिमंडळ

भारत आणि इटलीदरम्यान कामगार आणि रोजगारविषयक प्रशिक्षण आणि शिक्षण सुरु ठेवण्याविषयीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 08 NOV 2018 10:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत आणि इटलीदरम्यान कामगार आणि रोजगारविषयक प्रशिक्षण आणि शिक्षण कार्यक्रम सुरु ठेवण्याबाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.         

लाभ :

या सामंजस्य करारामुळे कामगारांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधांचा विस्तार करुन त्यांच्या क्षेत्रात दर्जेदार कामांना प्रोत्साहन देणे या करारामुळे शक्य होणार आहे. त्यासाठी

कामाची पद्धत आणि तंत्रविषयक संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.

विविध सामाजिक भागीदारांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षणाच्या नव्या पद्धती विकसित करणे.

श्रम आणि रोजगारविषयक विविध संकल्पनांवर आधारित आणि ग्राहकाच्या मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.

प्रशिक्षण कार्यक्रमातील चांगल्या पद्धतींची विशेषतः कामगार प्रशासनविषयक कार्यक्रमाची देवघेव, प्रशिक्षण पद्धती आणि अभ्यास दौरे आखण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे.

माहिती आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी प्रशिक्षकांची देवघेव करणे.

 

महत्वाचे परिणाम :

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातील कामगारविषयक तंत्रज्ञान क्षमता वाढतील तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्याची भारताची क्षमता विकसित होईल. या करारामुळे आशिया प्रशांत प्रदेशात भारताची सामाजिक भागीदारी विस्तारण्यास मदत होईल.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 



(Release ID: 1552262) Visitor Counter : 74


Read this release in: English