पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडच्या हरसिल येथे पंतप्रधानांनी केली जवानांसह दिवाळी साजरी

Posted On: 07 NOV 2018 1:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या हरसील येथे आई.टी.बी.पी आणि  भारतीय सैन्याच्या जवानांसह आज दिवाळी साजरी केली.

या मंगल प्रसंगी जवानांना शुभेच्छा देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशा सुदूर, उंच डोंगराळ भागात, भारतीय जवान देत असलेली  सुरक्षा सेवेची  समर्पित वृत्ती  राष्ट्राला बळकट बनविते आणि १२५ कोटी जनतेच्या स्वप्नांना आणि भविष्याला सुरक्षितता निश्चित करते.

ते पुढे म्हणाले की, दिवाळी हा दीपोत्सव असून, हा उत्सव चांगल्या विचारांचा प्रकाश पसरवितो आणि लोकांना  भयमुक्त करतो. भारतीय जवान सुद्धा त्यांची देश सेवेची बांधिलकी आणि शिस्त याद्वारे सुरक्षेची भावना आणि लोकांना  भयमुक्त राहण्यासाठी विश्वस्त करते. 

पंतप्रधानांनी, ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून प्रत्येक दिवाळी सैनिकांबरोबर घालवत असण्याला उजाळा दिला , त्यांनी आई.टी.बी.पी.च्या  जवानांबरोबर काही वर्षांपूर्वी  जेंव्हा ते कैलास मानसरोवरचा एक भाग होते तेंव्हा केलेल्या चर्चेसंदर्भातही पंतप्रधानांनी  माहिती दिली.

पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण क्षेत्रात भारत मोठी प्रगती होत असून, ओ.आर.ओ.पी (वन रँक, वन पेंशन) यासह भूतपूर्व सैनिकांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघा तर्फे, भारतीय सशस्त्र दलाची शांततेच्या कार्यासाठी  प्रशंसा केली जात असून , त्यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त  केली आहे.

 पंतप्रधानांनी जवानांना मिठाई दिली आणि दिवाळीच्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी  आलेल्या जवळच्या परिसरातील लोकांबरोबरही त्यांनी संवाद साधला.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1552089) Visitor Counter : 52


Read this release in: English