सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे 9 ते 11 नोव्हेंबर दरम्म्यान 'माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिव्यांग तरुणांसमोरची आव्हाने" कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 08 NOV 2018 1:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2018

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे 9 ते 11 नोव्हेम्बर दरम्यान  'माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिव्यांग तरुणांसमोरची आव्हाने" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरियन सरकार आणि आंतरराष्ट्रीय पुनर्वसन विभागाच्या सरकार्याने भारत ही परिषद आयोजित करत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिव्यांग तरुणांसमोरची आव्हाने या कार्यक्रमाचा हेतू दिव्यांग तरुणांना आय टी क्षेत्रात नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने ओळखून माहिती आणि दूरसंवाद क्षेत्रात त्यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. या कार्यक्रमात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे दिव्यांग व्यक्तींनाही जागतिक पातळीवर आय टी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. संयुक्त राष्ट्रांच्या दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारणाविषयी झालेल्या परिषदेतील जाहीरनाम्यात असलेल्या  नियम 21ची अंमलबजावणी करण्यासठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते 9 नोव्हेंबरला या परिषदेचे उदघाटन होईल आणि या कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवणाऱ्या व्यक्तींना 11नोव्हेंबरला त्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येतील. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमाअंतर्गत विविध गटात दिव्यांगांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात  येतील. 13 ते 21 वर्ष वयोगटातील दिव्यांग व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. या कार्यक्रमात जगभरातील 18 देशांमधले सुमारे 100 दिव्यांग युवक सहभागी होणार आहेत.

जगभरात सध्या सुमारे 1 अब्ज दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यातही विकसनशील देशांमध्ये दिव्यांगांची संख्या तुलनेने अधिक आहे. अशा दिव्यांग व्यक्ती आय टी आणि आय सी टी सारख्या क्षेत्रातील रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी, हा विशेष कार्यक्रम घेतला जाणार आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 



(Release ID: 1552086) Visitor Counter : 80


Read this release in: English