माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात


इजरायल असणार कंट्री फोकस

झारखंड फोकस स्टेट

डेन वॉल्मॅन यांना मिळणार जीवनगौरव पुरस्कार

Posted On: 06 NOV 2018 5:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2018

 

49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 (इफ्फी) 20 ते 28 नोव्हेंबर 2018 दरम्यान गोवा येथे होणार आहे. या महोत्सवाच्या 49 व्या आवृत्तीत 68 देशांतील वैविध्यपूर्ण 212 चित्रपट प्रदर्शित होतील.  आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपट आहेत ज्यातील 3 भारतीय आहेत. स्पर्धा विभागातच 22 देशांनी  निर्मिती व सह-निर्मिती केलेल्या चित्रपटाचा समावेश आहे.

फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप विभागात समीक्षकांनी प्रशंसा केलेले 20 आंतरराष्ट्रीय चित्रपट घेतले आहेत  जे  काही मुख्य चित्रपट फेस्टिव्हलमध्ये  आधी प्रदर्शित झालेत व त्यापैकी बहुतांश चित्रपट विविध पुरस्कारप्राप्त असे आहेत.   चांगल्या आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे  प्रदर्शन करणारा  हा विभाग या उत्सवातील सर्वात महत्वाच्या विभागांपैकी  एक आहे.

वर्ल्ड पॅनोरामा विभागात 67 चित्रपट आहेत जे विशेषतः या उत्सवासाठी निर्मित करण्यात आले आहे.  यात 4 वर्ल्ड प्रीमियर, 2 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 15 आशिया प्रीमियर आणि 60 इंडिया प्रीमियर समाविष्ट आहेत. यावर्षी वर्ल्ड पॅनोरामा विभागात 15 चित्रपट संबंधित देशांकडून ऑस्करसाठी प्रवेशित झालेले आहेत.

इंगमर बर्गमन यांच्या 100 व्या वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त ‘वाइल्ड एट हार्ट मास्टर इन इन क्राफ्ट: इंगमर बर्गमन रीट्रोस्पेक्टिव्ह सेक्शन: 2018’ हा विभाग असेल . याप्रसंगी  त्यांचा शतकोत्तर वर्धापन दिन जगभर साजरा  होत असतांना इफ्फीतर्फे  त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम 7 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. मेरी न्यरेरोडने दिग्दर्शित केलेल्या "बर्गमन आयलंड"  या बर्गमन यांच्यावरील  माहितीपटाला सदर विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. या विभागाचे अधिकृत उद्घाटन 21  नोव्हेंबर रोजी ‘वाईल्ड स्ट्रॉबेरी' च्या   स्क्रिनिंगनंतर पॅनेल चर्चासत्रासह होईल.

आंतरराष्ट्रीय स्टार कलाकारांची भूमिका असलेला 'द अ‍ॅस्पर्न पेपर्स' च्या वर्ल्ड प्रीमियरसह  महोत्सवाचा प्रारंभ होईल.  एस्परन पेपर्स  हा प्रेमाचा,  त्याग आणि  साहसी स्वप्ने यांची कथा सांगणारा एक चित्रपट आहे.  डिलीगेशन: जोनाथन-हेस मेयर्स (मुख्य अभिनेता) - गोल्डन ग्लोब विजेत्या ज्योइली रिचर्डसन (मुख्य अभिनेत्री) - ऑस्कर नामांकित अभिनेत्री जूलिया रॉबिन्स (अभिनेत्री)  मॉर्गन पोलान्सकी (अभिनेत्री रोमन पोलान्सकी यांची कन्या) मिस्टर निकोलस हॉव (अभिनेता) मिस्टर ज्युलियन लॅडीएस (दिग्दर्शक).

दरवर्षी इफ्फीत एक विभाग विशिष्ट देशावर केंद्रीत असतो, ज्या देशात सिनेमातील उत्कृष्टता आणि त्या देशाचे योगदान प्रदर्शित केले जाते.  इफ्फीच्या 49 व्या  आवृत्तीमध्ये  फोकस कंट्री इजरायल ही आहे.  मुंबईतील इजरायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने दहा चित्रपटांना  कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले गेले आहेत. कंट्री फोकस सेक्शनसाठी 'द अदर स्टोरी' हा पहिला चित्रपट असेल. स्टीव्हन स्पीलबर्ग द्वारा  दिग्दर्शित ‘रँबो-3, 'म्यूनिच’, रिडले स्कॉट यांचा ‘बॉडी ऑफ लाईज’ आणि ‘द डार्क नाइट राइजेज’ अशा अनेक या नामवंत हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध इस्रायली अभिनेता ऍलन आबॉर्बोल हे विशेष अतिथी म्हणून इझरायलमधील महत्वाच्या सिलेब्रिटीजसह उपस्थित राहतील. यानिमित्ताने 22 नोव्हेंबर 2018 रोजी इंडो-इझरायल सह-निर्मिती परीसंवादाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

49 व्या इफ्फी 2018 साठी एक स्टेट फोकस विभाग प्रस्तावित करण्यात आला आहे. विशिष्ट राज्याच्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने हा विभाग भारतीय राज्यांच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करेल. 49 व्या  इफ्फी 2018 साठी झारखंड राज्य फोकस स्टेट म्हणून निवडले गेले असून 24 नोव्हेंबर 2018 रोजी झारखंड दिवस म्हणून या उत्सवात साजरा केला जाईल. झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये  डेथ इन गंज, रांची डायरी, बेगम जान यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय  स्पर्धा ज्युरी मंडळात जॉन इर्विन, अॅड्रियन सितारू, पोलिश  निर्देशक रॉबर्ट ग्लिंस्की, अ‍ॅना फेरायोलिओ रॅवेल आणि भारतीय सदस्य राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा समावेश आहे.

देशभरातील विविध भागांतील निर्मात्यांनी पाठविलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून 26  फिचर (कथाधारित) आणि 21 नॉन-फीचर (कथाबाह्य) भारतीय चित्रपटांची निवड भारतीय पॅनोरामा ज्यूरीतर्फे करण्यात आली आहे. फीचर फिल्म ज्यूरींनी शाजी एन. करुण यांचा दिग्दर्शित चित्रपट 'ओलू'  भारतीय पॅनोरामा 2018 विभागाची उद्घाटकीय फीचर  चित्रपट म्हणून निवडला आहे . नॉन-फीचर फिल्म जूरीने आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेला 'खर्वस' हा चित्रपट भारतीय पॅनोरामा 2018  च्या नॉन-फीचर फिल्म  विभागाच्या उद्‌घाटनासाठी निवडला आहे.   प्रमुख  फिचर चित्रपट  खालील प्रमाणे आहेतः 

अ.क्र.

चित्रपटाचे शिर्षक

भाषा

दिग्दर्शक

1

ओलू ( ओपनिंग फिल्म)

मल्याळम

शाजी एन करुण

2

नगरकिर्तन

बंगाली

कौशिक गांगुली

3

सा

बंगाली

अरिजीत सिंह

4

उमा

बंगाली

श्रीजीत मुखर्जी

5

अब्यक्तो

बंगाली

अर्जुन दत्ता

6

उरोनचडी

बंगाली

अभिषेक साहा

 

तेरा सदस्यांच्या फीचर फिल्म जूरीचे प्रमुख म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक राहुल रावेल आणि इतर प्रमुख सदस्यांचा समावेश होता:

1. मेजर रवि, चित्रपट निर्माते आणि अभिनेता 2. अहथियान, संचालक 3. उज्ज्वल चटर्जी,  दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक 4. इमो सिंग,  दिग्दर्शक 5. उत्पल दत्ता, चित्रपट निर्माते  व इतर

सात सदस्यांच्या नॉन फीचर फिल्म ज्युरीचे प्रमुख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व एडिटर विनोद गणत्रा होते. ज्युरीमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता:

1. उदय शंकर पनी, चित्रपट निर्माते

2. पार्वती मेनन, संचालक आणि चित्रपट शिक्षणविद्

3. मंडल तळौलीकर, चित्रपट निर्माते

4. पद्‌मराज नायर, चित्रपट पत्रकार

5. अशोक शरण, अभिनेता व निर्माते

6. सुनील पुराणिक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

   49 व्या इफ्फी 2018 साठी स्केच ऑन स्क्रीन (अॅनिमेशन फिल्म पॅकेज) हा एक विभाग प्रस्तावित आहे. या विभागात भारतीय स्टुडिओच्या सहकार्याने सुमारे 3 आंतरराष्ट्रीय फीचर  चित्रपटाचे प्रदर्शन होईल.

या महोत्सवादरम्यान ओपन एअर स्क्रिनिंग्स आयोजित केली जातात, जेथे  विस्तीर्ण जागेत एक मोठी स्क्रीन  लावली जाते. यावर्षी खेलो इंडिया ब्रँडिंगचा विस्तार म्हणून  49 व्या  इफ्फीमध्ये  स्पोर्टस बायोपिक प्रदर्शित केले जातील. गोल्ड, मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, 1983, एमएसडीः ड अ‍नटोल्ड स्टोरी व सूरमा हे या विभागात समाविष्ट असलेले चित्रपट आहेत.

इफ्फी, इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिस यांच्या सहकार्याने, यूनेस्कोने मांडलेल्या आदर्शांना प्रतिबिंबित करणाऱ्‍या चित्रपटाला युनेस्को गांधी पदक व एका खास आईसीएफटी पुरस्काराद्वारे सन्मानित करते. या प्रतिष्ठित पुरस्काराने चित्रपट सन्मानित होण्यासाठी यावर्षी 10 चित्रपटांची निवड केली जाणार आहे. 

मास्टर क्लासेस आणि इन-कनव्हरसेशन विभागात प्रसून जोशी, डॅन वॉलमन, श्रीकर प्रसाद, अनिल कपूर, सुमित इसरानी. बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, डेव्हिड धवन, वरुण धवन, रोहित धवन, जयराज, कौशिक गांगुली, शाजी करुण, श्रीजीत मुखर्जी, श्रीधर आणि श्रीराम राघवन, अनुपमा चोप्रा, राजीव मसंद, भावना सोमाया, जेसन हॅफोर्ड, मेघना गुलजार, लीना यादव, गौरी शिंदे या चित्रपट उद्योगातील अनेक व्यक्तींचा समावेश असणार आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा देशाचा सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार प्राप्त करणाऱ्‍या चित्रपटांचे पुनरावलोकनही इफ्फीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावर्षी विनोद खन्ना यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे.  अचानक, लेकिन आणि अमर अकबर अँथनी या त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शनही यावेळी  करण्यात येईल.

जीवनगौरव पुरस्कारप्राप्तकर्ता पुर्नावलोकन विभागात पुरस्कारप्राप्तकर्त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करून सिनेमाच्या क्षेत्रात जीवनगौरव पुरस्कारप्राप्तकर्ता यांचे   योगदान  अधोरेखित केले जाते. यावर्षी इस्रायलचे डॅन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

आपल्या देशाच्या चित्रपटात क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली देण्यासाठी 'होमेजेस्‌' हा विभाग आहे.  यावर्षी स्वर्गीय शशी कपूर, स्वर्गीय श्रीदेवी,  स्वर्गीय   एम. करुणानिधी व   स्वर्गीय  कल्पना लाजमी यांना   श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय होमेजेस्‌ मध्ये यावर्षी   टेरेन्स मार्श, मिलोस फोरमॅन आणि ऍनी व्ही कोटेस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

अंधत्वाने बाधित मुलांसाठी विशेष स्क्रीनिंग व  ऑडिओ वर्णनासह  चित्रपट विशेष पॅकेजमध्ये प्रदर्शित केली जातील. या विभागात 'शोले' आणि 'हिचकी' हे चित्रपट प्रदर्शित होतील. यावर्षी  ट्युनिशियन चित्रपटांसंदर्भातही एक विशेष सादरीकरण असेल.                       

 

N.Sapre/ D.Wankhede/P.Kor

 



(Release ID: 1552014) Visitor Counter : 181


Read this release in: English