रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकं पूर्णपणे बंद करण्यासाठी हाती घेतली धडक मोहीम

Posted On: 02 NOV 2018 6:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2018

 

भारतभरातील ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकं पूर्णपणे बंद करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

1 एप्रिल 2018 रोजी ब्रॉडगेज मार्गांवर 3 हजार 479 मानवरहित रेल्वे फाटकं होती. गेल्या सात महिन्यात यापैकी 3 हजार 402 फाटकं पूर्णपणे बंद करण्यात आली असून उरलेली 77 फाटकं डिसेंबर 2018 पूर्वी बंद करण्याची योजना आहे. मानवरहित रेल्वे फाटकांच्याऐवजी सब-वे उपलब्ध करून देऊन अथवा गार्ड नियुक्तीच्या माध्यमातून ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली आहेत.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor

 


(Release ID: 1551751) Visitor Counter : 81


Read this release in: English