नौवहन मंत्रालय

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत झालेल्या विकासामुळे सीमेपार व्यापारात लक्षणीय सुधारणा

Posted On: 02 NOV 2018 6:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2018

 

जागतिक बँकेच्या व्यवसायातील सुलभता निर्देशांकाच्या अहवालात भारताने 23 क्रमांकाची झेप घेतली आहे. या मोठ्या झेपेमध्ये ‘सीमापार व्यापार’ निर्देशांकातील प्रगतींचाही मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी भारत 146 चा स्थानावर होता, तर यंदा भारताने 80 वे स्थान पटकावले आहे.

भारताचा आयात निर्यात व्यापाराचा 92 टक्के एवढा मोठा वाटा बंदराद्वारे हाताळला जातो.

बंदरातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रक्रियेत सुधारणा आदींमुळे बंदरातील आयात/निर्यात होणाऱ्या मालाची हाताळणी सुलभ झाली आहे. यामुळे निर्यात दरात 382 डॉलर्सवरुन 251 डॉलर्स कपात झाली आहे तर आयातीचा दरही 543 डॉलर्सवरुन 331 डॉलर्सपर्यंत कमी झाला आहे.

महत्त्वाच्या बंदरांमध्ये आयात/निर्यात मालाची हाताळणी अधिक सुलभ झाल्याने भारतातील व्यवसाय सुलभतेत सुधारणा झाली असून यामुळे देशातील आर्थिक वाढीला चालना मिळेल, असे केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor(Release ID: 1551744) Visitor Counter : 59


Read this release in: English