जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

देशातल्या 91 मोठ्या जलाशयांतील पाणी साठवणूक पातळीत 3 टक्क्यांची घट

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2018 1:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2018

 

देशातल्या 91 मोठ्या जलाशयातील पाणी साठवणूक पातळीत 3 टक्क्यांची घट झाली आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात या 91 जलाशयातली पाण्याची पातळी एकूण पाणी साठवणूक क्षमतेच्या 67 टक्के म्हणजेच 109.247 बीसीएम होती. 25 ऑक्टोबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात हीच पातळी 70 टक्के होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी या जलाशयातली साठवणूक क्षमता गेल्या 10 वर्षांच्या सरासरी क्षमतेच्या 97 टक्के होती. या 91 जलाशयांपैकी 37 जलाशयातून 60 मेगावॅटहून अधिक वीज निर्मिती होते.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1551701) आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English