मंत्रिमंडळ
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यत्व संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना खुले करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
01 NOV 2018 1:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यीय देण्यासाठी चौकटीविषयक करारात सुधारणा करण्याला मान्यता देण्यात आली.
फायदे
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यत्व खुले झाल्यास सौर ऊर्जेचा जागतिक कार्यक्रमपत्रिकेत समावेश होऊन सौर ऊर्जेचा विकास आणि वापर यांना वैश्विक आवाहन मिळेल. यामुळे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सर्वसमावेशक होईल आणि संयुक्त राष्ट्राचे सर्व सदस्य देश सदस्य होऊ शकतील. सदस्यत्वाच्या विस्तारामुळे सौर आघाडीच्या पुढाकाराचे फायदे सर्व जगाला मिळू शकतील.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1551484)