पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ राष्ट्राला अर्पण

Posted On: 31 OCT 2018 8:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभ भाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा,  जगातील सर्वाधिक उंच पुतळा ''स्टॅच्यू ऑफ युनिटी'' त्यांच्या जयंती दिवशी  राष्ट्राला अर्पण केला. हा पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे उभारण्यात आला आहे .

प्रक्षेपण समारंभाच्या वेळी पंतप्रधान आणि इतर मान्यवरांनी देशाला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या समर्पणाचे प्रतीक म्हणून माती आणि नर्मदेचे पाणी कलशामध्ये ओतले. पुतळ्याचा आभासी अभिषेक सुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी कळ दाबली.

त्यांनी 'युनिटी वॉलचे'' उद्‌घाटन केले. एकता पुतळ्याच्या चरणाशी पंतप्रधानांनी खास प्रार्थना केली. त्यांनी संग्रहालय आणि प्रदर्शन, तसेच दर्शकांच्या गॅलरीला भेट दिली. 153 मीटर उंची असलेली ही गॅलरी एका वेळी 200 पाहुण्यांना सामावून घेऊ शकते. सरदार सरोवर धरणाचे जलाशय, सातपुरा आणि विंध्य पर्वत  रांगाचे  एक उत्कृष्ट दृश्य बघायला मिळते. समर्पण सोहळा, आयएएफ विमानाच्या फ्लायपास्टने आणि  विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला.

या प्रसंगी भारताच्या लोकांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देश आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत आहे.

आज भारताच्या इतिहासात एक विशेष क्षण चिन्हांकित केल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले  की, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने आज भारताला  भविष्यासाठी प्रचंड प्रेरणा दिली आहे. सरदार पटेल यांच्या धैर्य, क्षमता आणि संकल्पनेच्या भविष्यातील पिढ्यांना ही प्रतिमा कायम राहील, असेही त्यांनी सांगितले. सरदार पटेल यांनी भारताला  एकसंघ  केले, त्यामुळे आज भारताची मोठी आर्थिक आणि रणनीतीक शक्ती बनण्याच्या मोहिमेत वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या प्रशासकीय सेवेच्या दृष्टिकोनाला पोलादी फ्रेम सारखे स्मरणात राहील असे असे सांगून, त्यांनी एकता पुतळ्याला शेतकऱ्यांचा स्वाभिमान असे संबोधिले , ज्यांनी त्यांच्या जमिनीतून माती आणि शेती अवजारातून पुतळ्याच्या बांधकामासाठी पोलाद पुरविले. भारताच्या तरुणांच्या इच्छा, आकांशा या केवळ ''एक भारत, श्रेष्ठ भारत''  या मंत्राद्वारे साकारू शकेल असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी या पुतळ्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि  आभार मानले.  तसेच या पुतळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर  पर्यटक या विभागाला भेट देतील असेही त्यांनी सांगितले.

अलिकडच्या वर्षांत स्वातंत्र्यसेनानी आणि महान नेत्यांनी केलेल्या कार्याच्या योगदानाची आठवण राहावी यासाठी अनेक स्मारके तयार करण्यात आले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शिवाय त्यांनी दिल्लीतील संग्रहालय सरदार पटेल यांना, गांधीनगरमधील महात्मा मंदिर आणि दांडी कुटीर गांधीजी यांना, बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना पंचातीर्थ,  हरियाणातील श्री छोटू राम यांची प्रतिमा आणि श्यामजी कृष्णा वर्मा यांचे स्मारक आणि कच्छमधील वीर नायक गोविंद गुरू स्मारक राष्ट्राला अर्पण  केले असल्याचे सांगितले.  तसेच  दिल्ली वस्तू संग्रहालय सुभाषचंद्र बोस यांना, मुंबईतील शिवाजी पुतळा आणि देशभरातील आदिवासी संग्रहालयांचे कार्यही प्रगतीपथावर असल्याचे   सांगितले.

पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या दृढ आणि  सर्व  समावेशी भारताबद्दलच्या  दृष्टीकोणाबद्दल सांगितले  तसेच  केंद्र  सरकार, त्यांचे  स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम करीत असल्याचेही ते म्हणाले. सर्वांसाठी घर उपलब्ध करून देणे, सर्वांना वीज पुरवण्यासाठी आणि रस्त्याच्या संलग्नतेसाठी तसेच  डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देखील नमूद केली. जीएसटी, ई-एनएएम आणि "वन-नेशन, वन ग्रिड" यासारख्या प्रयत्नांनी राष्ट्रांना विविध मार्गांनी एकत्रित करण्यासाठी योगदान दिले आहे.

देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आणि सर्व विभाजक शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी आपली  सामूहिक जबाबदारी असल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले.

 

B.Gokhale/P.Kor

 


(Release ID: 1551481) Visitor Counter : 176


Read this release in: English