मंत्रिमंडळ

भारत-कोरिया दरम्यान पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 01 NOV 2018 12:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोरिया दरम्यानच्या सामंजस्य कराराला आज मान्यता देण्यात आली.

या सामंजस्य करण्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार
  • पर्यटनाशी संबंधित माहिती आणि आकडेवारीचे वाढते आदान-प्रदान
  • हॉटेल्स आणि सहल व्यावसायिकांसहित पर्यटन क्षेत्राशी सर्व संबंधितांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे
  • मनुष्यबळ विकास क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आदान-प्रदान कार्यक्रम स्थापन करणे
  • पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देणे
  • दोन्ही देशातल्या पर्यटनात वाढ होण्यासाठी सहल आयोजक/माध्यमे/यांच्यताल्य भेटींचे आदान-प्रदान
  • पर्यटन स्थळांचा विकास आणि व्यवस्थापन, पर्यटन स्थळांना चालना या क्षेत्रात अनुभवांचे देवाण-घेवाण
  • दोन्ही देशांमधल्या पर्यटन जत्रा/प्रदर्शन या मधल्या सहभागासाठी चालना देणे
  • सुरक्षित, आदरणीय, शाश्वत पर्यटनाला चालना

 

पार्श्वभूमी

भारत आणि कोरिया दरम्यान मजबूत आणि दीर्घ राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी आता उभय देशांमध्ये सहकार्य मजबूत करण्याची इच्छा आहे.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1551469) Visitor Counter : 89


Read this release in: English