वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताची व्यवसाय सुलभतेच्या श्रेणीमध्ये  23  स्थानांनी सुधारणा


जागतिक बँकेच्या ‘डूइंग बिझिनेस अहवालात’ भारताचा  77 वा क्रमांक

Posted On: 31 OCT 2018 6:30PM by PIB Mumbai

 

 दिल्ली 31 ऑक्टोंबर 2018  

जागतिक बँकेद्वारे  आज नवी दिल्ली येथे   ‘डुईंग़ बिझिनेस रिपोर्ट-2019  (डीबीआर, 2019)  हा अहवाल प्रसिद्‌ध करण्यात आला.    जागतिक बँकेने  मुल्यांकन केलेल्या 190 देशांमधून 2017 यावर्षीच्या 100 व्या क्रमांकावरून 23 स्थाने पार करुन 77 व्या क्रमांकावर भारताने झेप घेतली आहे  . व्यवसाय सुलभीकरणाच्या   क्रमवारीत भारताने  23  स्थाने पुढे गाठल्याची बाब महत्वपुर्ण आहे.  गेल्यावर्षी भारताने 30स्थानांनी  आपल्या क्रमवारीत सुधारणा केली होती. भारतासारख्या  मोठ्या आणि  वैविध्यपुर्ण  देशासाठी ही दुर्मिळ कामगिरी आहे. सरकारच्या सतत प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत भारताने आपल्या क्रमवारीमध्ये  53  स्थानांनी  आणि गेल्या चार वर्षात 65  स्थानांनी आगेकूच करुन सुधारणा केली आहे.

‘डुइंग बिझिनेस’ मूल्यांकनात व्यवसायाच्या जीवन चक्रानुसार व्यवसाय नियंत्रणारीता   नियम  व त्यांची अंमलबजावणी  यावर प्रभाव टाकणा-या  दहा    निर्देशकांच्या आधारे 190 अर्थव्यवस्थांची माहिती मिळते.    डिस्टन्स टू फ्रंटीअर  (डीटीएफ)  या  गुणांकाच्या आधारावर डीबीआर अहवालात देशांना स्थान दिले आहे.     जागतिक  बेस्ट प्रॅक्टिस  व  एखाद्या अर्थव्यवस्थेचा या  प्रॅक्टिसच्या तुलनेत असणा-या   तफावतीला  दर्शविण्यासाठी  डीटीएफ या गुणांकाचा  वापर केला जातो.   मागील वर्षी 60.76 या डीटीएफवरून भारताचा डीटीएफ गुणांक हा   67.23 वर गेला आहे.

भारताने 10 पैकी 6  निर्देशकांमध्ये आपले स्थान सुधारले आहे  .'बांधकाम परवाने' आणि   'ट्रेडिंग अ‍ॅक्रास बॉर्डर्स' संबंधित निर्देशकांमध्ये सर्वात  ठळक  सुधारणा नोंदवली गेली आहेत. बांधकाम परवाने मंजूर  करण्यासंदर्भादच्या निर्देशाकांत, 2017 मध्ये भारताचा क्रमांक 181 वरुन 52व्या  क्रमांकावर 2018  मध्ये सुधारला. एका वर्षामध्ये 129  स्थानांनी श्रेणीत सुधारणा झाली. 'ट्रेडिंग अ‍ॅक्रास  बॉर्डर्स' मध्ये, भारताने  2017 मध्ये146 वरुन 80 व्या  क्रमांकावर झेप घेत  यावर्षी 66 स्थानांनी आपल्या क्रमवारीत सुधारणा केली.

यावर्षी भारताच्या कामगिरीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये अशी आहेत:

  • जागतिक बँकेने वर्षभरात भारताला  शीर्षस्थानी  सुधारणा करणारा  एक देश म्हणून ओळखले आहे.
  • भारताला शीर्षस्थानी  सुधारणा करणारा  देश म्हणून ओळखले जाण्याचे हे  सलग दुसरे वर्ष आहे
  • सलग काही वर्षांमध्ये  भारत हा शीर्षस्थानी  सुधारणा करणारा   प्रथम ब्रिक्स आणि दक्षिण आशियाई देश आहे.   
  • 2011  नंतर व्यवसायातील मूल्यमापनानुसार 53 क्रमांकावर  श्रेणीत सुधारणा करून भारताने कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत दोन वर्षांमध्ये सर्वाधिक सुधारणा केली आहे.
  • सातत्यपुर्ण कामगिरीच्या आधारे, दक्षिण आशियाई देशांमध्ये 2014 मध्ये सहाव्या स्थानावर असलेला भारत देश आता प्रथमस्थानी आहे.

***

पी.आय. बी. रिलीज  ध.वानखेडे 



(Release ID: 1551443) Visitor Counter : 71


Read this release in: English