आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

‘आशा’ सहाय्यकांच्या पर्यवेक्षक भेट शुल्कात वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 24 OCT 2018 4:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने ‘आशा’ सहाय्यकांसाठी 2018-2019 ते 2019-2020 पर्यंत प्रत्येक पर्यवेक्षक भेटीचे शुल्क  250 रुपयांवरून  300 रुपयापर्यंत वाढवायला मंजुरी दिली आहे, ऑक्टोबर 2018 पासून (नोव्हेंबर, 2018 मध्ये पैसे दिले जातील) हे लागू होईल. ‘आशा’ सहाय्यकांना दरमहा सुमारे 20 पर्यवेक्षी भेटी घेईल. प्रस्तावित वाढीसह, ‘आशा’ सहाय्यकांना दरमहा रु. 5000 ऐवजी 6000 रुपये मिळतील म्हणजे मासिक एक हजार रुपयांची वाढ होईल.

विवरणः

‘आशा’ लाभ पॅकेजचा भाग म्हणून  प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आणि  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत आशा सहाय्य्यकांची नोंदणी

आशा सहाय्यकांना उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने पर्यवेक्षण भेट शुल्क  ऑक्टोबर 2018 पासून  250 रुपये प्रति भेट वरून वाढवून  300 रुपये प्रति भेट करण्यात आले आहे.

1000 रुपये वाढीसह आशा सहाय्यकांना आता दरमहा 5000 रुपये ऐवजी दरमहा 6000 रुपये मिळतील.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या सध्याच्या संस्थात्मक यंत्रणेचा वापर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केला जाईल.

या प्रस्तावामुळे 46.95 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होण्याचा अंदाज असून यामध्ये 15.65 कोटी रुपये 2018-19 दरम्यान (6 महिन्यांसाठी) आणि  2019-20 दरम्यान केंद्राचा हिस्सा म्हणून  31.30 कोटी रुपये समाविष्ट आहेत.

41,405 आशा सहाय्यिका

हे लाभ 19.09.2018 रोजी मंत्रिमंडल निर्णयात दिलेल्या लाभांव्यतिरिक्त आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय ) आणि  प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अंतर्गत 10,63,670 आशा आणि आशा सहाय्यिका सामील

10,22,265 आशा सहाय्यिकांना लाभ पोहचावा यासाठी नियमित आणि आवर्ती प्रोत्साहनात  दरमहा 1000 रुपये वरून दरमहा  2000 रुपये इतकी वाढ

सुमारे 27,00,000 अंगणवाडी कार्यकर्ते/ अंगणवाडी सहाय्यिकांच्या मानधनात वाढ

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1550564) Visitor Counter : 94


Read this release in: English