वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एसआयएएल पॅरिस प्रदर्शनात 45 भारतीय कंपन्या सहभागी

Posted On: 23 OCT 2018 5:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  23 ऑक्टोबर 2018

 

अन्न सेवा व्यावसायिकांसाठीची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या एसआयएएल पॅरिस प्रदर्शनात 45 भारतीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कंपन्यांसाठी भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषदेने (टीपीसीआय) विशेष कक्षाचे उद्घाटन केले. व्यवसायाच्या नव्यानव्या संधी शोधण्यासाठी हे प्रदर्शन हा उत्तम मंच असल्याचे टीपीसीआयचे प्रमुख मोहित सिंगला यांनी सांगितले. प्रदर्शनादरम्यान भारतीय उत्पादने आणि कंपन्यांबाबत ग्राहकांना आकर्षक वाटत असून यामुळे भारत आणि युरोप यांच्यात सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

एसआयएएल पॅरिस प्रदर्शनाचे दर दोन वर्षांनी आयोजन करण्यात येते. यंदा या प्रदर्शनात फ्रान्ससह 109 देशांमधले 7,020 हून अधिक जण सहभागी झाले आहेत.

 

N.Sapre/S.Kakde/P.Kor

 



(Release ID: 1550356) Visitor Counter : 54


Read this release in: English