राष्ट्रपती कार्यालय

दुर्गा पूजा, दसरा आणि विजयादशमीनिमित्त राष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 18 OCT 2018 5:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2018

 

दुर्गापूजा दसरा आणि विजयादशमीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 ‘शुभो बिजोया’ तसेच दसऱ्यानिमित्त शुभेच्छा आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या आहेत. दुर्गा पूजा आणि विजयादशमी हे दुष्ट प्रवृत्तींवर सत्याच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. दुर्भागी, एकाकी आणि कष्टी लोकांबरोबर आपला आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. जनतेमध्ये एकता आणि बंधुता ही भाव दृढ करण्याची ही एक संधी आहे.

दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक आहे. महिला आणि विशेषत: मुलींच्या सबलीकरणाच्या आपल्या प्रयत्नांना ते मार्गदर्शक ठरो. नैतिक आणि शाश्वत मूल्य जोपासण्यासाठी श्री राम यांचे चरित्र मार्गदर्शक ठरेल, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

Click here for President Message

 

N.Sapre/P.Kor

 



(Release ID: 1550029) Visitor Counter : 69


Read this release in: English