पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने रोड शो

Posted On: 17 OCT 2018 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2018

 

सरकार ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना करत आहे, असे प्रतिपादन  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत केले. त्‍यांच्या हस्ते इंडियन स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हसच्या दुसऱ्या टप्प्यातल्या रोड शो चा आज प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने एकात्मिक ऊर्जा धोरणानुसार ‘स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस’ला (एसपीआय) तत्त्वत: मान्यता दिली आहे. या कार्यक्रमानुसार ओडिशातल्या चंडीखोल येथे भूगर्भाअंतर्गत अतिरिक्त 6.5 एमएमटी तेल साठ्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कर्नाटकमध्ये पडूर इथले 2.5 एमएमटी तेलसाठा उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

इंधन वापराबाबत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्याचबरोबर कच्चे तेल आयातीतही भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था लक्षात घेता आगामी दोन दशकात इंधनाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी उपाययोजनेची आवश्यकता आहे, असेही धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

या प्रकल्पामध्ये भागीदारी करण्यासाठी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी पेट्रोलियम मंत्रालयाने रोड शोचं आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय निविदेसाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी हा रोड शो आयोजित केले होते.

या प्रकल्पाची तांत्रिक तसेच आर्थिक माहिती अंमलबजावणीविषयी निश्चित करण्यात आलेले नियम याविषयी ‘रोड शो’च्या माध्यमातून माहिती संबंधितांना देण्यात आली.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1549975) Visitor Counter : 56


Read this release in: English