संरक्षण मंत्रालय

भारतीय नाविक दलाच्या पाणबुडी बचाव क्षमतेमध्ये वाढ

Posted On: 17 OCT 2018 6:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2018

 

भारतीय नाविक दलाच्या पाणबुडी बचाव क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात नाविक दलाच्या पश्चिम विभागाने ‘डीएसआरव्ही’ या बचावकार्यात वापरण्यात येणाऱ्या वाहनाची नुकतीच चाचणी यशस्वी झाली. तीन जणांनी ‘डीएसआरव्ही’च्या सहाय्याने नादुरुस्त झालेल्या पाणबुडीमधल्या 14 जणांना एकाचवेळी वाचवण्यात यश मिळवले.

नाविक दलाने 15 ऑक्टोबर रोजी ही चाचणी घेतली. पाण्यात 300 फूट खालीवर गेलेल्या पाणबुडीमधून काही जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांना ‘डीएसआरव्ही’मध्ये आणण्याचे कार्य आणि बचाव वाहनातून सागरी किनाऱ्यांवर आणण्याचे कार्य या तिघा जवानांना देण्यात आले होते. त्यांनी ते यशस्वीपणे पूर्ण केले. या चाचणीच्या काळात डीएसआरव्हीला जवळपास 666 मीटर दूरवर सूर मारावे लागले, अशी माहिती पश्चिम नाविक दलाने दिली आहे.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1549974) अभ्यागत कक्ष : 123
Read this releasein: English