अल्पसंख्यांक मंत्रालय

हज अनुदान रद्द केले तरी यात्रेकरूंवर अतिरिक्त आर्थिक बोझा नाही-मुख्तार अब्बास नकवी

Posted On: 17 OCT 2018 3:59PM by PIB Mumbai

 

मुंबई, 17 ऑक्टोबर 2018

 

हज यात्रेकरूंची सुरक्षा, सुविधा, त्यांना आरोग्य सेवा याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामध्ये कोणतीही कमतरता, उणीव ठेवण्यात येणार नाही, असे मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले.  आज मुंबईमध्ये ‘हज 2019’ विषयी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुढच्यावर्षी 100 टक्के डिजिटल कार्यप्रणालीद्वारे अनुदान मुक्त हज 2019 ची माहिती नकवी यांनी दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिले आधीच ‘हज 2019’चा कार्यक्रमा आज जाहीर करण्यात आला.

मुंबई हज हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत नकवी यांनी सांगितले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या वर्षाची (2018) हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी पुढच्या वर्षीच्या (2019) हज प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. यामुळे हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुसलमानांची सोय होणार असून हजला जाणे अधिक सोपे, सुकर होणार आहे. हज 2019 साठी उद्या 18 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मोबाईल ॲपच्या सहाय्यानेही हज इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. तर ऑफलाईन अर्ज 22 ऑक्टोबरपासून सादर करता येणार आहेत. हजर 2018 मध्ये एकूण 3 लाख 55 हजार 604 अर्ज सादर करण्यात आले होते. त्यामुळे 1 लाख 89 हजार 217 पुरुष तर 1 लाख 66 हजार 387 महिलांचा समावेश होता, अशी माहिती नकवी यांनी यावेळी दिली.

हजसाठी जाणाऱ्यांना योग्य प्रकारे सुविधा देता यावी, यासाठी नेहमीपेक्षा यंदा लवकर हज प्रक्रियेला प्रांरभ करण्यात येणार आहे. भारत आणि सौदी अरब -2 मध्ये हज यात्रेशी संबंधित कार्यरत असणाऱ्या एजन्सांनाही हजची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळू शकणार आहे. परिणामी हजयात्रा अधक चांगली, सोपी होऊ शकणार आहे. नोव्हेंबर महिन्यात हजसाठी हवाई कंपन्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सौदी अरबमध्ये निवासासाठी जागा निश्चित करण्याचे कार्य करण्यात येणार आहे. मक्का आणि मदिना येथे निवासस्थानांसाठी 2018 इतकेच भाडे ठेवण्यात येणार आहे. देशातल्या 20 विमानतळांवर हजसाठी यात्रेकरून जाऊ शकतील. त्याचबरोबर यंदा कालिकत विमानतळावरुनही हज यात्रेकरू जाऊ शकणार आहेत.

कोणत्याही अनुदानाशिवाय 2018 मध्ये पहिल्यांदाच यात्रेकरू हजला जाऊन आले. कोणत्याही मध्यस्थ, दलालांशिवाय आणि अनुदान नसताना तसेच कोणतीही दरवाढ न होता 2018 मध्ये हज यात्रा चांगल्या तऱ्हेने पार पडली. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच जहज 2018च्या काळात विमानांच्या तिकिटांचे दर कमी झाले होते. 2017 मध्ये 1 लाख 24 हजार 852 हज यात्रेकरूंसाठी 1030 कोटी रुपये विमान कंपन्यांना हवाई भाड्यासाठी देण्यात आले होते. तर 2018 मध्ये हज समितीच्या माध्यमातून जाणाऱ्या 1 लाख 28 हजार 702 हज यात्रेकरूंसाठी 973 कोटी रुपये देण्यात आले. याचाच अर्थ 2017 च्या तुलनेत यंदा हवाई भाड्यासाठी 57 कोटी रुपये कमी देण्यात आले, असेही नकवी यांनी यावेळी सांगितले.

2018 ची हज यात्रा अतिशय यशस्वी ठरली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विक्रमी संख्येने भारतीय मुसलमानांनी ही यात्रा केली. 1 लाख 75 हजार 25 भारतीय मुसलमान 2018 मध्ये हजला गेले होते. हा नवा विक्रम आहे. 2019 मध्ये यापेक्षाही जास्त संख्येने भारतीय मुसलमान हजला जातील, अशी अपेक्षा आहे.

हज हाऊसवर सर्वात उंच तिरंगा

मुंबईच्या हज हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात आज नकवी यांनी दर्शक दीर्घेचे उद्‌घाटन केले आणि हज हाऊच्या गच्चीवर लावण्यात आलेल्या विशाल राष्ट्रध्वज यावेळी फडकवण्यात आला. हा विशाल राष्ट्रध्वज 20X30 फूट आकाराचा आहे. हज हाऊसच्या गच्चीवर 30 मीटर उंच ‘हाय मास्ट’च्या सहाय्याने हा ध्वज सर्वात उंचावर लावण्यात आला आहे. जमिनीपासून 350 फूट उंचीवर लावण्यात आलेला हा ध्वज सर्वात उंच आहे. एखाद्या इमारतीच्या गच्चीवर इतक्या उंचीवर लावलेला आतापर्यंतचा हा पहिलाच तिरंगा ध्वज आहे. हा ध्वज समुद्रसपाटीपासून 116 मीटर उंचीवर आहे.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor

 



(Release ID: 1549946) Visitor Counter : 127


Read this release in: English