आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

झिका विषाणू आणि हंगामी तापाची समस्येविषयी जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा

Posted On: 16 OCT 2018 5:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2018

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत झिका विषाणू आणि हंगामी तापाची साथ यांचा प्रतिबंध करून साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याविषयी चर्चा करण्यात आली.

आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदन, सचिव आणि आयसीएमआरचे संचालक, प्राध्यापक बलराम भार्गव, डॉ. एस. व्यंकटेश, आरोग्य मंत्रालयातले अतिरिक्त सचिव संजीवकुमार, मनोज झालानी आणि इतर वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख असे संबंधित आरोग्य विभाग, संस्थांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

राजस्थानमध्ये झिका विषाणूबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या विषाणूंचा प्रसार होऊ नये आणि साथ तातडीने नियंत्रणात यावी यासाठी उपाययोजनांबरोबर सातत्याने काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. राजस्थानच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमित संपर्क ठेवून आहे आणि आवश्यक त्या उपायांची योजना करण्यात आली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशीही जे. पी. नड्डा यांनी आज चर्चा केली. झिका विषाणूंचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

हंगामी तापाची साथही नियंत्रणात आणण्याविषयी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी यावेळी सूचना दिल्या.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1549859) Visitor Counter : 74


Read this release in: English