ऊर्जा मंत्रालय

सौभाग्य अंतर्गत पुरस्कार योजना जाहीर

प्रविष्टि तिथि: 15 OCT 2018 6:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2018

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर. के. सिंह यांनी आज कर्मचाऱ्यांसाठी ‘सौभाग्य’ अंतर्गत पुरस्कार योजना जाहीर केली. जे कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 100 टक्के घरांचे विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ती करणार आहेत, त्यांच्यासाठी ही पुरस्कार योजना आहे. देशातल्या आठ राज्यात आतापर्यंत 99 टक्के घरांच्या विद्युतीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. ‘सौभाग्य’ योजनेअंतर्गत असे 99 टक्के कार्य पूर्ण करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. मात्र या राज्यांचे संबंधित अधिकारी, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र धरले जाणार नाहीत. ज्या राज्यात घरगुती विद्युतीकरणाचे काम मागे पडले आहे, त्यांनी ते झपाट्याने पूर्ण करावे, यासाठी पुरस्कार योजना आज जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना तीन विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1549774) आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English