वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यामध्ये गुंतवणूक संदर्भात उच्चस्तरीय कार्यदलाची संयुक्त बैठक

Posted On: 15 OCT 2018 6:48PM by PIB Mumbai

 

मुंबई, 15 ऑक्टोबर 2018

 

भारतात गुंतवणूक करण्यासंबंधी संयुक्त अरब अमिरात आणि भारताच्या उच्चस्तरीय कार्यदलाची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. ही सहावी बैठक होती. या कार्यदलाची पाचवी संयुक्त बैठक जानेवारी 2018 मध्ये अबूधाबी येथे झाली होती. या बैठकीत मंजूर झालेल्या कमाच्या प्रगतीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच परस्पर महत्त्वाच्या प्रमुख नवीन मुद्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांच्या दृष्टीने गुंतवणुकीसंबंधी महत्त्वपूर्ण मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

अबूधाबीचे प्रमुख नेते शेख हमेद बिन जायेद अल नहिआर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महामार्ग, पायाभूत सुविधा, सागरमाला प्रकल्प आणि नवीन हरित क्षेत्र विमानतळांची निर्मिती या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध संधी याविषयी बैठकीत चर्चा झाली.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor

 


(Release ID: 1549772) Visitor Counter : 135


Read this release in: English