दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत नेट योजना लागू करण्यात बीबीएनएलचा महत्त्वपूर्ण सहभाग

Posted On: 15 OCT 2018 4:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2018

 

नवी दिल्लीतल्या किडवाई नगर भागात भारत ब्रॉड ब्रॅण्ड नेटवर्क लिमित्त (बीबीएनएल)च्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्‌घाटन दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज करण्यात आले. भारत नेट प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये ‘बीबीएनएल’ने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. याबद्दल मनोज सिन्हा यांनी गौरवोद्गार काढले. बीबीएनएलमुळे देशभरातल्या 2,50,000 ग्रामपंचायती डिजिटल कनेक्शनमुळे जोडल्या गेल्या आहेत. यामुळे ई-गव्हर्नन्स, ई-आरोग्य, ई-शिक्षण, ई-बँकिंग अशा अनेक सुविधा देशाच्या सर्व भागात पोहोचू शकल्या आहेत. आपल्या खात्याने विविध योजनांचे प्रकल्पांचे लक्ष्य जवळपास 50 टक्के पूर्ण केले असल्याचेही मनोज सिन्हा यांनी यावेळी सांगितले.

नगरविकास मंत्रालयाकडून 30 वर्षांच्या भाडेकराराने बीबीएनएलने जागा घेतली असून त्या जागेत हे नवे कॉर्पोरेट कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

 

N.Sapre/S.Bedekar/P.Kor

 



(Release ID: 1549736) Visitor Counter : 113


Read this release in: English