सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

ऑगस्ट 2018 साठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

Posted On: 12 OCT 2018 6:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2018

 

ऑगस्ट 2018 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) 127.4 इतका राहिला जो ऑगस्ट 2017 च्या तुलनेत 4.3 टक्के अधिक आहे. एप्रिल-ऑगस्ट 2018 मध्ये औद्योगिक विकास दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5.2 टक्के राहिला.

ऑगस्ट 2018 मध्ये  खाण, निर्मिती आणि वीज क्षेत्रात उत्‍पादन वाढीचा दर ऑगस्ट 2017च्या तुलनेत अनुक्रमे (-)0.4 टक्के, 4.6 टक्के आणि 7.6 टक्के राहिला. तर एप्रिल-ऑगस्ट 2018 मध्ये या तिन्ही क्षेत्रांचा उत्‍पादन वृद्धि दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे  3.9, 5.4 आणि  5.8 टक्के राहिला. या काळात फर्निचरच्या निर्मितीत 29.2 टक्के इतकी सर्वाधिक वाढ नोंदली गेली. ‘कम्‍प्‍यूटर, इलेक्‍ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्‍पादने निर्माण’ नामक उद्योग गटाने (-)7.3 टक्के वाढ नोंदवली. तंबाखू उत्पादनांच्या निर्मितीने (-)17.0 टक्के वाढ नोंदवली.

उपयोग आधारित वर्गीकरण  अनुसार ऑगस्ट  2018 मध्ये प्राथमिक वस्‍तु(प्राइमरी गुड्स), भांडवली वस्तू, मध्‍यवर्ती वस्तू आणि पायाभूत निर्माण वस्तूंचा वृद्धी दर ऑगस्ट  2017 च्या तुलनेत अनुक्रमे 2.6 टक्के, 5.0 टक्के  2.4 टक्के आणि 7.88 टक्के राहिला, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीचा दर ऑगस्ट 2018 मध्ये 5.2 टक्के राहिला तर बिगर-टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंचा वृद्धि दर ऑगस्ट 2018 मध्ये 6.3 टक्के राहिला.

सप्टेंबर 2018 चा निर्देशांक 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला जाईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1549597) Visitor Counter : 92


Read this release in: English