उपराष्ट्रपती कार्यालय

डॉक्टरांसाठी गुणवत्ता आणि करूणा-नितीमूल्य आणि समानता ही मार्गदर्शक तत्त्वे असावीत-उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 12 OCT 2018 5:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2018

 

डॉक्टरांसाठी गुणवत्ता आणि करुणा तसेच नितीमूल्य आणि समानता ही मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पदवी शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना सांगितले. ते आज पुदुच्चेरी येथे जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नवव्या पदवीदान समारंभाला संबोधित करत होते.

ही संस्था वैद्यकीय शिक्षणात 200 वर्ष कार्यरत असून देशातील अव्वल पाच वैद्यकीय संस्थांपैकी एक आहे. या संस्थेत गरीबांना 90 टक्के उपचार मोफत पुरवले जात असल्याबद्दल प्रशंसा केली. देशातील हे सहावे सर्वोत्तम रुग्णालय असून देशातल्या गरीबांसाठी वरदान असल्याचे ते म्हणाले. टेलिमेडिसीन आणि टेलिकॉन्फरन्सिंग सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. देशातील तसेच बिमस्टेक देशांमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये या संस्थेशी जोडलेले आहेत.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1549583) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English