वस्त्रोद्योग मंत्रालय

फिक्की एफएलओच्या मुंबई शाखेने आयोजित केलेल्या चर्चासत्राला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री उपस्थित

Posted On: 11 OCT 2018 7:15PM by PIB Mumbai

 

मुंबई, 11 ऑक्टोबर 2018

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज फिक्की एफएलओ मुंबई शाखेच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी वस्त्रोद्योग तसेच देशाच्या आर्थिक विकासात महिलांचे योगदान यासह विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला. पंतप्रधान मुद्रा योजना आणि स्टार्ट अप भारत या दोन योजनांचा लाभ सुमारे 80 टक्के भारतीय महिलांनी घेतल्याचा त्यांनी सांगितले. या योजनांनी तरुण महिला उद्योजकांना त्यांचा स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज सुविधा आणि अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. जर हा कल असाच सुरू राहिला तर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र राष्ट्रीय सकल उत्पादनात मोठे योगदान देणारा ठरेल, असे त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि जननी सुरक्षा योजना यांसारख्या योजनांनी महिलांना उल्लेखनीय लाभ मिळवून दिला. फॅशन ॲण्ड डिझाईन मासिकाच्या संपादक शेफाली वासुदेवन यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.

महिलांचे आरोग्य, सुरक्षा याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, सरकारने लैंगिक अत्याचारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध कायदे आणले आहेत. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणासाठी हे कायदे आणि न्यायालयीन प्रक्रिया जाणून घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. महिलांनी समर्पित वृत्तीने कठोर परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पार्श्वभूमी

एफएलओ हा फिक्कीची महिला शाखा आहे. आग्नेय आशियातील ही सर्वात जुनी आणि सर्वात मोठी महिला उद्योजक संस्था आहे. भारतात त्याच्या 15 शाखा आहेत. तर सदस्यीय संख्या 5,500 आहे. महिलांनी स्वत:चे सामर्थ्य आणि क्षमता ओळखावी ही यावर्षीची संकल्पना आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1549539) Visitor Counter : 65


Read this release in: English